दि. २५/०४/२०२३ मंगळवार रोजी बालभवन, ग्रामपंचायत खडकी बु., ता. चाळीसगाव, जि. जळगाव येथे मा.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव यांच्या निर्देशनानुसार तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव व वकिल संघ चाळीसगाव यांचे संयुक्त विद्यमानाने, श्री.एन.के.वाळके अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर चाळीसगाव यांचे मार्गदर्शनाखाली दुसरे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग चाळीसगाव श्रीमती. एस.आर.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व श्री. एस.डी.यादव सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग चाळीसगाव, श्री. ए.एच.शेख, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग चाळीसगाव, श्री. प्रशांत पाटील, तहसिलदार चाळीसगाव, श्री.जितेंद्र धनराळे नायब तहसिलदार, श्री. राहुल साळुंखे, कर निरीक्षक नगर परिषद चाळीसगाव, तालुका वकीलसंघ चाळीसगावचे खजिनदार श्रीमती. एन.एम.लोडाया व सन्माननीय सदस्य तसेच श्री.रमेश पोतदार, पी.एल.व्ही, श्री. देवेश दिपक पवार, पी.एल.व्ही. यांचे उपस्थितीत फिरते विधी सेवा केंद्र व लोक अदालतचे वाहनास हिरवा झेंडा दाखवून खडकी बु. येथे प्रस्तान. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी बालभवन, खडकी बु. येथे शिबीराचे व फिरते लाेक अदालतीस सुरुवात झाली. श्री. धनंजय सुकदेव मांडोळे, सामाजिक कार्यकर्ता खडकी बु. यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमाची प्रस्तावना केली व नालासा गाण्याने सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. सदर शिबीरात अॅड.सुलभा शेळके, सदस्य तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापाूसन संरक्षण व खावटी विषयक अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले. अॅड.योगिता पाटील, सदस्य तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी महिलांचे दिवाणी अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले. अॅॅड.श्री.लव हरी राठोड, सदस्य तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी आरोपींचे हक्क, कायदेशीर जागरुकता व त्यांच्या विधीसेवेचा लाभ या विषयावर मागदर्शन केले. अॅड. वर्षा एकनाथ देवरे, सदस्य तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी पी.सी. अॅण्ड पी.एन.डी.टी. कायद्याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती एस.आर.शिंदे दुसरे सह दिवाणी न्यायाधीश तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग चाळीसगाव यांनी बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ या विषयावर मार्गदर्शन केले.
सदरील फिरते लोकन्यायालयात दाखल असलेले दिवाणी व फौजदारी प्रकरणे १६ पैकी ०७ इतके निकाली काढण्यात आले त्या बाबतची वसुली रक्कम रु.११,२३,३१२/- इतकी करण्यात आली. तसेच श्री.सचिन गुलाब पवार, सरपंच ग्रामपंचायत खडकी बु. ता. चाळीसगाव यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने केली. सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री.डी.के.पवार, श्री. डी. टी. कु-हाडे व श्री. किशोर पाटील यांनी पाहिले. सदर कार्यक्रमास सौ. सुवर्णा धनंजय मांडोळे, उपसरपंच खडकी बु., श्री.विनायक वसंत मांडोळे, पोलीस पाटील खडकी बु., सौ. मनिषा गणेश मराठे पोलीस पाटील खडकी बु., श्री. कुष्णा दत्तात्रय पाटील ग्रामसेवक खडकी बु. व गावातील ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.
पाचोरा बाजार समितीत ५९ उमेदवार रिंगणात;१६८ उमेदवारांची माघार