प्रतिनिधी: मुंबई
नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावी पूर्व वैमनस्यातून अक्षय भालेराव या युवकाची निघृण हत्या करण्यात आली आहे. हे दुष्कृत्य केवळ निषेधार्ह नसून मानवतेला काळीमा फासणारे आहे. मराठा सेवा संघ या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध करत आहे. असे संघाकडून कळविण्यात आले आहे. सर्वच नागरिकांना जाहीर आवाहन करत आहे की, कृपया या प्रकरणाला जातीयवादी स्वरुप देऊ नये. अलिकडे दुर्दैवाने काही गटातील किंवा वैयक्तिक पातळीवर निर्माण झालेले वाद सलोख्याने मिटत नाहीत. ते सुप्त अवस्थेत वाढत जातात. तर त्याला पेटवणारे काही समाजद्रोही व्यक्ती सुध्दा असतात आणि एका क्षणी त्याचे रूपांतर अशा गंभीर दुर्घटनेत होते. सध्या महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरसुद्धा जातीय, जमातीय, भाषिक, प्रांतिक, धार्मिक, आध्यात्मिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक वातावरण गढूळ करणाराही मोठा
समुह कार्यरत आहे. परिणामी त्यांना समाजात दुफळी निर्माण करणे शक्य झाले आहे. राजकारणाच्या नावाखाली कधी कधी विद्वेषपूर्ण भाषा वापरली जाते. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी अशा समाज द्रोही संस्था वा विचारांपासून सावध व दूर रहावे असे आवाहन केलेले आहे. गावोगावी संवाद संपर्क समन्वय समिती स्थापन करून संपूर्ण सलोखा कायम राहील याची दक्षता घ्यावी ही विनंती केली जाते. असे असतानाही अक्षय भालेराव हत्या प्रकरण घडते हे सर्वांसाठी चिंतन करायला लावणारे आहे. या पार्श्वभूमीवर माझी आपणास विनंती आहे की कृपया कोणीही या प्रकरणाला जातीयवादी स्वरूप देऊ नये. बोंढार गाव व परिसरात सामंजस्याचे व सौहार्दाचे वातावरण राहील याची काळजी घ्यावी. बुध्द-शिव- फुले- शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर विश्वास असणाऱ्यांनी संविधानाच्या चौकटीत राहून जनसामान्यांच्या मनातील भिती दूर करण्यासाठी काम करावे ही विनंती आहे, असे मराठा सेवा संघाच्या पुरुषोत्तम खेडेकर
यांनी म्हटले आहे.
जयकिरण प्रभाजी शैक्षणिक संस्था स्कूल ११ व्या वषीॅ हि गरुडझेप कायम