पाचोरा(वार्ताहर) दि,११
रेल्वेत नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील ७ तरुणांची २० लाखात फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. पाचोरा पोलिसात प्रकाश सोनवणे या संशयीता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादी मोहन चौधरी यांनी पाचोरा पोलिसात फिर्याद दिली आहे त्यांनी फिर्यादी त म्हटले आहे की, मी लोहटार या ठिकाणी पत्नी छाया चौधरी, मुलगा सुरज चौधरी, सुन भाग्यश्री चौधरी यांचेसह एकत्र कुटुंबात राहतो व शेती करून परीवाराचा उदरनिर्वाह करतो. तसेच प्रकाश सोनवणे रा.भुसावळ यांना ओळखतो त्यांची मुलगी आमचे लोहटार ता. पाचोरा गावात दिलेली आहे. त्यामुळे त्यांचे आमचे गावात येणेजाणे असल्याने आम्ही त्यास ओळखत होतो. तसेच त्याचा व्याही हिलाल गायकवाड यांचे मध्यस्थीने आम्ही त्याचेवर विश्वास ठेवला होता व परंतु ते ही मयत झालेले आहेत. प्रकाश सोनवणे हा भुसावळ येथे रेल्वेत नोकरीस असल्याने त्याने मला व गावातील इतर ६ लोकांना विश्वासात घेवुन त्याने आम्हाला सांगितले की, माझी रेल्वेतील मोठ्या अधिकारी यांचेशी ओळख असल्याने मी रेल्वेत नोकरीसाठी त्यांचे मार्फत तुमच्या मुलांची कामे करून देईल. सन – २०१४ मध्ये प्रकाश सोनवणे हा त्याची मुलगी हिचेकडेस लोहटार ता. पाचोरा गावी आला होता व तो मला म्हणाला की, तुमचा सुरज चौधरी याला रेल्वेत नोकरी लावुन देतो असे सांगितले होते. त्यासाठी त्याने माझ्याकडुन तीन लाख रुपये रोख घेतले होते. तसेच त्याने माझ्याकडुन व आमचे गावातील राहणारे खालील इतर ६ लोकांकाडुन देखील त्यांचे मुलांना रेल्वेत नोकरी लावुन देण्याबाबत सांगुन मोहन चौधरी यांचे कडुन तीन लाख रुपये रोख, मोतीलाल चौधरी यांचेकडुन तीन लाख रुपये रोख, राजाराम राघो पाटील यांचेकडुन तीन लाख रुपये रोख, आत्माराम चौधरी यांचेकडुन तीन लाख रोख, निलेश चौधरी यांचेकडून तीन लाख रुपये रोख, रावसाहेब पाटील यांचेकडुन तीन लाख रुपये रोख, पंकज पाटील यांचेकडुन घेतले. असे एकूण वीस लाख रुपयांचा गंडा आम्हास घातला आहे. फेब्रुवारी सन – २०१४ मध्ये प्रकाश सोनवणे रा. भुसावळ हा लोहटार गावी आला होता. त्यावेळी त्याने माझा मुलगा सुरज मोहन चौधरी रा. लोहटार ता. पाचोरा तसेच आमचे गावातील वरील लोकांकाडुन त्यांचे मुलांना रेल्वे विभागात नोकरी लावुन देण्याचे आमिष दाखवुन मी व गावातील इतर लोकांनी त्याचेवर विश्वास ठेवल्यानंतर त्याने माझेकडुन व वरील साक्षीदार यांचेकडुन वेळोवेळी त्यांचे घरी जावुन तीन लाख रुपये व काम झाल्यानंतर प्रत्येकांकडुन दोन लाख रुपये परत द्यावे असे तो म्हणाला होता. परंतु त्याने माझा व गावातील इतर वरील लोकांचे मुलांना आजपावेतो रेल्वे विभागात नोकरी लावली नाही व आमचे पैसे देखीलपरत केलेले नाहीत तसेच आम्ही त्यास आम्ही दिलेले पैसे परत मागितले असता ते देखील आजपावेतो आम्हास परत केलेले नाहीत. त्यामुळे आमची खात्री झाली की माझी व गावातील वरील साक्षीदार यांची त्याने विस लाख रुपये घेवून फसवणुक केली आहे. म्हणुन माझी त्याचे विरुध्द कायदेशीर फिर्याद आहे. अशी फिर्याद मोहन चौधरी यांनी प्रकाश सोनवणे विरोधात दिल्यावरून पाचोरा पोलीसात सोनवणे यांचे विरुद्ध फसवणूकीचा चा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांचे मार्गदर्शनाखाली पो. कॉ. प्रकाश पाटील हे करीत आहे.
सोमवार पासून नगरदेवळा येथील गुरांचा बाजार पूर्ववत सुरू होणार- सभापती गणेश पाटील यांची माहिती
पती दुसऱ्या महिलेसोबत; पाचोऱ्यात गुन्हा दाखल