प्रवीण ब्राह्मणे-
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर तिकीट निश्चितीच्या प्रक्रिये दरम्यान विद्यमान खासदार यांचे संदर्भात वादग्रस्त विषय समोर आणून त्यांची उमेदवारी अडचणीत आणायच्या कित्ता पुन्हा एकदा गिरवला जात असून माजी खासदार ए टी पाटील यांचे मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी व्हायरल झालेले कथित फोटो प्रकरणामुळे त्यांच्या नशिबी आलेल्या राजकीय संन्यासा नंतर पुन्हा एकदा जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपा खासदार उन्मेष पाटील यांचे बाबतीत आर्थिक व्यवहारातुन फसवणूक झाल्याचा तक्रारी अर्ज छत्रपती संभाजी नगर येथील बेगमपूरा पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान याबाबत अद्याप गुन्ह्याची नोंद झालेली नसली तरी गुन्हा घडलेल्या ? पोलीस स्टेशन हद्दीत तक्रारी अर्ज वर्ग होणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे नेते अमित शहा यांचा मंगळवारी होणाऱ्या जळगाव दौऱ्याच्या आधीच हे प्रकरण समोर आल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मलकापूर जि बुलढाणा येथील श्रीनिवासा प्रोटीन प्रा. लि.
प्रसिद्ध उद्योजक तथा फिर्यादी संजय सिनगारे यांनी दाखल केलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे, की खासदार उन्मेष पाटील, त्यांचे मेव्हणे प्रशांत वाघ, सीए जाधव व त्यांचे मावसभाऊ रामेश्वर भानुसे यांनी सिनगारे बंधुंनी बोली लावून विकत घेतलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील श्रीनिवासा प्रोटीन प्रा. लि. (पूर्वीची रसोया प्रोटीन प्रा. लि.) या कंपनीत गोड बोलून व विविध आश्वासने देऊन संचालक म्हणून प्रवेश मिळवला. तसेच, कंपनीच्या खात्यातून बळजबरीने हातउसणवारीच्या नावाखाली वेळोवेळी ३.५० कोटी रूपये हे सीए जाधव यांच्या वडिलांच्या नरहरी जाधव यांच्या खात्यात वर्ग करून घेतले. तसेच, या कंपनीचे कर्ज मंजूर होण्यापूर्वी व युनीट चालू करण्याकरिता लागलेला खर्च १०.५० कोटी रूपये हा आम्ही नंतर तुम्हाला देऊ, असे सांगून करवून घेतला. परंतु, पैसे मागितले असता देणार नाही, असे सांगून काय करायचे ते करा, असे धमकावले व ईडी, सीबीआय मागे लावायची धमकी देऊन पैसे देण्यास टाळाटाळ चालवली आहे. एवढेच नाही तर वेळोवेळी तीन कोटी रूपयांची रक्कम खासदार साहेबांना लागते आहे, असे सांगून कंपनीतून काढून घेतली. या पैशाचीही मागणी केली असता, सिनगारे बंधुंसह संचालकांना धमक्या देऊन दमदाटी केली व पैसे दिले नाहीत. तसेच, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकार्यांना हाताशी धरून कंपनीच्या संचालक पदाच्या कोर्या राजीनामापत्रावर सह्या देण्यास धमकावले, कंपनीतील शेअर्स रक्कम २० कोटी रूपये मला रोख स्वरूपात द्या, मी ती तुम्हाला फिरवून देतो, म्हणजे तुमचा व कंपनीचा काही संबंध राहणार नाही, असे बजावले. तसेच, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील शासकीय विश्रामगृहावर शिविगाळ, दमदाटी करून धमक्या दिल्यात, अशा आशयाचा तक्रारअर्ज संजय मोहनराव सिनगारे यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात दाखल केलेला आहे. काल, दि.२ मार्च रोजी पोलिसांनी हा तक्रारअर्ज दाखल करून घेतला असून, अद्याप खासदार उन्मेष पाटील व इतरांविरोधात गुन्हे दाखल झालेले नसून या अर्जातील गुन्हा घडल्याचे घटनास्थळ आपल्या पोलिस ठाणे हद्दीतील नाही त्यामुळे तो संबंधित पोलिस ठाण्याकडे पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान याबाबत खासदार उन्मेष पाटील यांचे मेव्हणे तथा कंपनीचे संचालक प्रशांत वाघ यांनी याप्रकरणी बाजू मांडत तक्रारदाराचे सर्व आरोप फेटाळले असून चाळीसगावच्या एका मोठ्या लोकप्रतिनिधीचे हे कटकारस्थान असल्याचे म्हटले आहे.त्यामुळे त्यांचा रोख आमदार मंगेश चव्हाण यांचे कडे असल्याचे बोलले जात असून त्यांनी पुढील प्रमाणे सविस्तर खुलासा प्रसिद्धीस दिला आहे.त्यात म्हटल्या प्रमाणे..
जालना येथील उद्योगपती संजय सिंगारे यांनी संभाजीनगर येथील बेगमपुरा पोलीस ठाण्यात दिलेली लेखी तक्रार धादांत खोटी व बनावट असून या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. वास्तविक या कंपनीशी खासदार उन्मेश पाटील यांचा काहीएक संबंध नाही. मी व प्रमोद जाधव आम्ही श्रीनिवासा प्रोटीन्स प्रा. ली. कंपनीचे संचालक आहोत. वास्तविक संजय सींगारे यांनी या कंपनीत त्यांच्या आधीच्या कंपनीचा अनुभव असल्याने त्यांनी सोयीस्कर रित्या परस्पर पैसे काढून घेतल्याची तक्रार मी व प्रमोद जाधव आम्ही बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात 29 जानेवारी 2024 रोजी दाखल केलेली आहे. वास्तविक खासदार उन्मेश पाटील यांचा कुठलाही काडीमात्र संबंध नसतांना चाळीसगाव येथील स्थानिक मोठया लोकप्रतिनिधीने निवडणुकीच्या तोंडावर शिनगारे परिवाराला हाताशी धरून राजकीय षडयंत्र करण्याचा प्रयत्न केला आहे.
फाजील प्रसिद्धीसाठी कोणत्याही प्रतिष्ठित व्यक्तीवर आरोप लावूणे हे स्टंट बाजीचे प्रकार असून लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली असे सर्रास गैर तक्रारी या निवडणुकांच्या पाश्वर्वभूमीवर होता आहेत.याच घाणेरड्या राजकीय उद्देशाने खासदार उन्मेश पाटील यांचे नाव तक्रारीत घेण्यात आले असून यांचा बोलविता धनी कोण आहे हे जनतेला माहीत आहे.
कपंनीचे संचालक प्रशांत वाघ यांनी वस्तुस्थिती मांडली असून वास्तविक संजय सिंगारे परिवाराला त्यांच्या या व्यवसायातला अनुभव असल्याने कंपनीचे सर्व व्यवस्थापन, व्यवहार त्यांच्याकडे दिलेले होते.त्यांनी त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग करून आमची फसवणूक केली आहे. त्यांनी कंपनीच्या खात्यातून परस्पर विविध कंपनीच्या नावाने खोटी बिले सादर करून कंपनीतून पैसे वळते केले. तसेच श्रीनिवासा कंपनीत तयार झालेला माल त्यांच्या बालाजी उद्योग या कंपनीच्या नावाखाली परस्पर विकून ते पैसे स्वतः कडे ठेवून कंपनीची आर्थिक फसवणूक केली. कंपनीचे फॉरेन्सिक ऑडिट झाले असता ही बाब उघड झाली. या अफरातफरीबाबत आम्ही संचालकांनी त्यांना वेळोवेळी सूचना दिल्या.बँकेला देखील खोटे स्टॉक स्टेटमेंट सादर करून बँकेचे देखील फसवणूक केली. संबंधित बँकेने त्यांना वेळोवेळी नोटिसा दिल्या त्या नोटिसांना त्यांनी कुठले उत्तर दिले नाही. त्यामुळे आम्ही बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात 29 जानेवारी 2024 रीतसर तक्रार दिलेली आहे.
शिंगारे परिवाराने श्रीनिवासा प्रोटीन्स कंपनीतून वेगवेगळ्या माध्यमाद्वारे १८ कोटी ५० लाख (साडे अठरा कोटी) रुपये काढून घेतले. याची त्यांनी आम्हाला साक्षांकित लेखी कबुली दिली आहे. उलटपक्षी आमची श्रीनिवासा प्रोटीन्स मध्ये सुमारे ११ कोटी (अकरा कोटी) रुपयाची गुंतवणूक अडकली आहे.
वास्तविक बघता शिंगारे परिवाराचे सर्व उद्योगधंदे दिवाळखोरीत निघालेले आले आहेत. व्यापाऱ्यांना दिलेले चेक बाऊन्स झाल्याने अनेक व्यापाऱ्यांची त्यांनी आर्थिक फसवणूक केलेली आहे.।उलट या चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे म्हटले आहे.
रणजित परदेशी यांना मा.फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार
पोलीस बॉईज असोसिएशनच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी पाचोरा येथील नदीम शेख
माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या स्वगृही भाजपात जाणार ? युवक संमेलनानिमित्त अमित शहांचा गुरुवारी दौरा ; मंत्री ना.गिरीश महाजन म्हणाले.