पाचोरा (वार्ताहर) दि,२६
पावसाळ्याच्या दिवसात वारंवार येणाऱ्या वादळ व पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित ( Power Cut) होऊ नये व ग्राहकांनी अखंडित सेवा देता यावी यासाठी पाचोरा शहर उपविभागा अंतर्गत शहर कक्ष ३ मध्ये येणारी अतिउच्चदाब वाहिनीचे पावसाळापूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत त्यामुळे शनिवार दि २७ व रविवारी दि २८ रोजी सकाळी ९ वाजेपासून दुपारी १ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार असून त्याबाबतचा सविस्तर तपशील महावीतरण कडून प्रसिद्धीस देण्यात आला आहे.
त्यानुसार शनिवार दि २७ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत ११ केव्ही इंडस्ट्रीयल फीडर निर्मल IND, पाणी टाकी परिसर, भडगाव रोड, गाडगेबाबा नगर, जुना अंतुर्ली रोड या भागातील तर रविवार दि २८ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत मा. न्यायालय परिसर, DYSP बंगलो परिसर, गो. से. हायस्कुल परिसर, SBI कॉलनी परिसर, हनुमान वाडी परिसर या भागातील वीज पुरवठा खंडित ( Power Cut) राहणार आहे
तरी वीज ग्राहकांनी उपरोक्त वेळापत्रकाची नोंद घेऊन विद्युत वितरण कंपनीस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
वनश्रीची करूण कहाणी; जिद्दीला सलाम!
फसवणूक प्रकरण अर्जाने जळगावचे खा. उन्मेष पाटील अडचणीत ? कटकारस्थानाचा आरोप; रोख आ.मंगेश चव्हाण यांचे कडे ??