पाचोरा (वार्ताहर) दि,०४.०५.२०२४
पावसाळ्याच्या दिवसात वारंवार येणाऱ्या वादळ व पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊ नये व ग्राहकांनी अखंडित सेवा देता यावी यासाठी पाचोरा शहर उपविभागा अंतर्गत शहर कक्ष ३ मध्ये येणारी अतिउच्चदाब वाहिनीचे पावसाळापूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत त्यामुळे शनिवार दि,०४.०५.२०२४ सकाळी ९ वाजेपासून दुपारी १ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार असून त्याबाबतचा सविस्तर तपशील महावीतरण कडून प्रसिद्धीस देण्यात आला आहे.
त्यानुसार शनिवार दि,०४.०५.२०२४ सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत ११ केव्ही पडावं नगरी फिडर वरील थेपडे नगर, बळीराम पाटील नगर,ठाकरे नगर, अभियंता नगर, यशोदा नगर, कॉलेज परिसर, शाहू नगर, तलाठी कॉलनी, चिंतामणी कॉलनी, पडावं नगरी, राजीव गांधी कॉलनी, साई पार्क, कॉलेज मागील भाग, या भागातील वीज पुरवठा खंडित राहणार आहे.
तरी वीज ग्राहकांनी उपरोक्त वेळापत्रकाची नोंद घेऊन विद्युत वितरण कंपनीस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
पाचोरा येथील जेष्ठ कवी पांडुरंग सुतार “कविवर्य कुसुमाग्रज” पुरस्काराने सन्मानित
पाचोरा डीवायएसपी कार्यालयातील पोलीस कर्मचारी श्री शकील शेख यांना एक मे महाराष्ट्र दिन रोजी पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह प्रधान
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत राजुरी बु. शाळेला पाचोरा तालुक्यातून प्रथम क्रमांक