भडगाव ता.20: पुढील शिवजयंतीनिमित्त पाचोरा-भडगाव मतदार संघातील प्रत्येक गावात शिवस्मारक उभारण्याची महत्वपूर्ण घोषणा काल शिवजयंतीच्या पाश्र्वभूमीवर आमदार कीशोर पाटील यांनी केली. आमदार कीशोर पाटील यांच्या या घोषणेने शिवप्रेमींनी स्वागत केले आहे.
मतदार संघातील शिवप्रेमींची मागणी पाहता वर्षभरात प्रत्येक गावात शिवस्मारक उभारण्याचे निश्चीत केले असुन यासाठी तब्बल साडेचार कोटी रूपयाचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा आमदार कीशोर पाटील यांनी काल भडगावात शिवजयंतीनिमित्त आयोजीत कार्यक्रमात केली. काल मतदार संघात
आमदार कीशोर पाटील यांनी कार्यक्रमांना भेटी दिल्या. त्यावेळी त्यांनी शिवप्रेमींनी शिवस्मारकाची मागणी केली. त्यावर आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाचे दैवत आहेत. त्यामुळे प्रत्येक गावात त्यांचे स्मारक होणे आवश्यक आहे. म्हणुनच शिवप्रेमींची स्मारकाबद्दलची आस्था पाहता वर्षभरात प्रत्येक गावात शिवस्मारक उभे करण्याचा निश्चय केला आहे. पुढच्या शिवजंयतीपर्यंत सर्व स्मारक पुर्ण करून त्यांचे एकत्रीत उट्घाटन करू असे आमदार कीशोर पाटील यांनी सांगीतले. आमदारांच्या या महत्वपूर्ण निर्णयाचे शिप्रेमींनी स्वागत केले आहे.
पाचोऱ्यात “शिव जयंती” निमित्त आज भरगच्च कार्यक्रम उत्सव समीती अध्यक्षांची पत्रकार परिषद