पाचोरा (pacharo) (वार्ताहर)
पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागातील शिवकॉलनी मधील २२ वर्षीय तरुण सागर कैलास महाजन याचा गुरुवारी दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
मुंबई (mumbai) मार्गावरील मालगाडी वरील लोको पायलट यांनी सदर युवकाने अपघात केला असल्याचा मेमो रेल्वे पोलिसांना दिला असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. दरम्यान अपघाताचे वृत्त कळताच कृष्णापुरी भागातील तरुणांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. घटनेचा पुढील तपास पी एस आय शब्बीर शेख व पी एस आय ईश्वर बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून या घटने बद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.