पाचोरा (वार्ताहर) दि,१४
भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील हस्तकाला दिल्याच्या आरोपातून पाचोरा येथील गौरव पाटील वय २३ या तरुणाला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली असून तो मुंबईच्या नौदल गोदीमध्ये सहा महिन्याचे प्रशिक्षणार्थी म्हणून कामाला होता. गौरव हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील रहिवासी असून सध्या ठाणे येथे भाडेतत्त्वावर राहत होता गौरवने आयटीआयचे शिक्षण घेतले असून नौदल गोदीमध्ये शिक्षणार्थी म्हणून सहा महिने काम केले आहे. येथूनच त्याने महत्वपूर्ण माहिती पाठवल्याचा संशय एटीएसला आहे.याबाबत एकूण चार जणांविरुद्ध यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आहे. यामध्ये दोन पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे. तिसऱ्या व्यक्तीबाबत अधिक तपास सुरू आहे.
एटीएसच्या पथकाने तांत्रिक पुराव्याच्या मदतीने गौरव पाटील या तरुणास ताब्यात घेत चौकशी केल्याची माहिती असून एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत फेसबुक व्हॉट्सअॅपद्वारे पाकिस्तानातील दोन हस्तकांशी त्याची ओळख झाली होती. याच ओळखीतून त्यांना आरोपीने गोपनीय व संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप आहे. गोपनीय माहितीच्या बदल्यात त्याने पैसे स्वीकारल्याचे देखील तपासात समोर आले असल्याचे बोलले जात आहे.त्यानुसार गौरव पाटीलसह त्याच्या संपर्कात असलेल्या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याने आतापर्यंत किती पैसे घेतले, कोणती माहिती दिली, तसेच किती जणांशी संपर्क साधला आहे याबाबत एटीएस अधिक तपास करत आहे. दरम्यान या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
प्रा जयंत इंगळे यांना इंग्रजी विषयात क.ब.चौ.उ म वि जळगाव ची पी एच डी प्रदान
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थालि.पाचोरा संस्थेची पंचवार्षिक निवडणूकबिनविरोध
(सी.सी.आय) केंद्र पाचोरा येथे कापुस खरेदी विक्रीसाठी नाव नोंदणी सुरु, सभापती-गणेश भिमराव पाटील