पाचोरा( वार्ताहर) दि,१८
पाचोरा शहरातील जारगाव चौफुली जवळ एका दुकानात चोरी करण्याच्या उद्देशाने दुकानाचे शटर तोडत असलेल्या एका आरोपीने रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस नाईक सचिन पवार यांचेवर डोक्यात टामी मारत प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून रक्तबंबाळ अवस्थेत असून देखील पोलीस नाईक सचिन पवार यांनी धेंर्य दाखवत आरोपीला पकडून ठेवत जेरबंद केल्याने सचिन पवार यांचे सह सहकारी गृहरक्षक दलाचा जवान व पोलिसांच्या या ढेर्याचे कौतुक होत असतांनाच पोलीस बांधवांवर झालेल्या या भ्याड हल्ल्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.दरम्यान याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप हिमत पाटील यांचे फिर्यादीवरून अशोकसिंग ईश्वरसिंग बावरी वय 22 याचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून कजगाव येथून देखील एका संशयीताला ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नेहमी प्रमाणे पोलीस शासकीय पोलीस वाहन क्रमांक MH 19 C2 6179 मधून रात्रगस्ती सुरू असतांना जारगाव चौफुली भागात गस्त करीत असतांना एका दुकानाचे शर्टरला लावलेला कुलुप तोडतांना एक इसम दिसला त्याचे डोक्यावर केशरी रंगाची पगड़ी, बांधल्यासारखे दिसले व शासकीय गाडी पाहून पळु लागला तेव्हा गाडी उभी करून सदर इसमास पकडण्यासाठी सर्व धावून गेलो. त्याचा पाठलाग करीत असतांना तो रस्त्यालगत उभ्या असलेले ट्रकांमध्ये घुसला म्हणुन ट्रकान कडे गेलो असता एका ट्रक मध्ये एक काळ्या रंगाचा मुलगा ज्याचे डोक्यावर वरील त्याचे केस बुचडी बांधलेला मुलगा ट्रक मध्ये अंधारात लपुन बसलेला दिसला व तो पोलिसांना पाहून ट्रक मधुन पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असतांना त्यास पोलीस नाईक सचिन पवार यांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्याचे जवळ असलेली एक लोखंडी टामीने सचिन पवार यांचे डोक्यात मारली परंतु सचिन पवार हे थोडे मागे सरकल्याने सदरची टॉमी ही त्यांचे डावे डोळ्याचे वरील कपाळावर लागली व सदरच्या टॉमीला पुढील बाजुस वाक असल्याने त्याचे अनुकुचीदार भागने सचिन पवा यांना दुखापत झाली परंतु त्यांनी सदर इसमास जागीच पकडले यावेळी त्यांच्यासमवेत गृहरक्षक दलाचे राहुल शेळके, गणपत जाधव हे होते. सदर इसमाने सचिन पवार यांन शासकीय गणवेश पकडुन त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न केला ट्रक मध्ये चढून त्यास (पकडले व सचिन पवार यांनी सदर इसमाच्या ज्या हातात टॉमी होती तो हात पकडुन ठेवलेला होता त्या इसमाच्या हाता मधुन आम्ही सदरची टॉमी काढुन घेतली व त्यास ताब्यात घेऊन पाठलाग करीत असलेल्या दुसऱ्या इसमा बाबत विचारपुस केली असता त्यांने माहीती देण्यास टाळाटाळ केली तेव्हा त्याचे पाठीस लटकवलेल्या बांगेत पाहीले असता त्यात दोन स्क्रू ड्रायव्हर व एक स्टिलची पिन मिळुन आली म्हणुन त्यास आम्ही ताब्यात घेतले व सदर इसमाने गणवेशात असलेले पोलीस नाईक सचिन पवार याच्यावर टॉमीने डोक्यात हल्ला केल्याने सचिन पवार यास गंभीर दुखापते होऊन रक्त स्त्राव होत असल्याने सदर बाब पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ करत आहेत.
हे देखील वाचा…
अत्याचारातून पाचोऱ्यात अल्पवयीन मुलगी ५ महिन्यांची गर्भवती; संशयित तरुण अटकेत
गो.से.हायस्कुल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा