(पाचोरा) दि,२०
पाचोरा येथे ग्राहक सेवा संघ पाचोरा-भडगाव संस्थेतर्फे जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने हुतात्मा स्मारक येथे ग्राहक प्रबोधन संस्थेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी अड. मनीषा पवार होत्या संस्थेचे सरचिटणीस आनंद नवगिरे यांनी प्रास्ताविक सादर केले. यावेळी मार्गदर्शन करताना जळगाव बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे सिनेट सदस्य व्ही. टी. जोशी यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 यामध्ये वेळोवेळी झालेले बदल आणि सुधारित ग्राहक संरक्षण कायदा 2019 या नवीन कायद्यातील तरतुदीची सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांनी नवीन घर घेताना कायद्याच्या महारेरा अंतर्गत नोंदणी करणे, करारनामा करणे व नोंदवून घेणे आवश्यक आहे. नोंदणी पत्रात सदनिका क्रमांक चटई क्षेत्र पार्किंग तपशील एकूण किंमत या तपशिलाची खात्री करून घ्यावी असे आवाहन केले ललिता पाटील यांनी अन्नपदार्थ आणि वस्तू मधील भेसळ कशी ओळखावी याबद्दल माहिती दिली गोपाल पटवारी यांनी ग्राहक सेवा संघाने गेल्या 33 वर्षात रेल्वे बँक वीज कृषी गॅस पोस्ट एलआयसी आदी विविध विभागातील ग्राहकांचे प्रश्न सोडविणे यांचा सविस्तर अहवाल सादर केला विद्या कोतकर यांनी भेसळ कशी ओळखावी याची व अन्नसुरक्षा कायद्याची माहिती दिली राधा शर्मा यांनी ग्राहकांनी ग्राहक संरक्षण कायद्यातील अधिकाराचा वापर करावा. वस्तू ,सामान खरेदी करताना पक्के बिल, गॅरंटी, वॉरंटी, कार्ड घ्यावे असे आवाहन केले. माया सूर्यवंशी यांनी जागतिक ग्राहक हक्क दिनाचे महत्त्व सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते खलील देशमुख यांनी ग्राहकांच्या कर्तव्या विषयी माहिती दिली. यावेळी कैलास अहिरे यांची ग्राहक सेवा संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विनोदराय मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उज्वला महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक महाजन यांनी मानले. कार्यक्रमास संस्थापक प्राचार्य डी. एफ. पाटील. प्रा. एल. बी. शर्मा, आर.पी. बागूल, शेरव रखलील, डी.बी. पाटील, डॉ. संजय माळी, राधेशाम दायमा, डॉ. भारतकुमार प्रजापत, एकनाथ सदनशीव, अशोक मोरे रितेश ललवाणी, डॉ. योगेश पाटील, संजय गोसावी, रविंद्र सोनवणे, राजेश धनराहे राकेश सावंत, अनिल येवले, सुरेश तांबे, शेख जावेद. सुनिल शिंदे, प्रविण ब्राम्हणे, विनोद अहिरे, साथी, दिलीप बागूल, लता शर्मा, संगिता नवगिरे, अनघा संगिता प्रजापत, माला पंजाबी, नवगिरे, निना राजपूत, संगिता जळतकर, दुर्गा मोरे, अनिता दायमा, अॅड. सोनवणे मॅडम, पुष्पा पाटील, आदि उपस्थित होते.
जीर्ण झालेले म.फुले व्यापारी संकुल पाडून नव्याने बांधणार आ.किशोर अप्पा पाटील यांचा व्यापाऱ्यांशी संवाद