माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या निर्देशनाप्रमाणे तसेच जिल्हा परिषद जळगाव दिनांक १५.०३.२०२३ चे पत्रान्वये दि.२३/०३/२०२३ रोजी हनुमान मंदिराचे आवारात, खरजई ता. चाळीसगाव येथे ‘कायदेविषयक जनजागृती मार्फत महिलांचे सक्षमिकरण’ निमित्त शिबीर तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव व तालुका वकील संघ चाळीसगाव आणि ग्रामपंचायत खरजई, चाळीसगाव यांचे संयुक्त विद्यमाने अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर चाळीसगाव श्री.एन.के.वाळके यांचे अध्यक्षतेखाली शिबीर घेण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात नालसा गाण्याने करण्यात आली.
सदर शिबीरात अॅड.श्री.पी.एस.सोनवणे, अध्यक्ष तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व मनोगत व्यक्त केले. अॅड.कविता वाल्मीक जाधव, सदस्य तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. अॅड.सुलभा शेळके, सदस्य तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी ‘हुंडा बळी’, ‘अॅसिड हल्ला’, ‘विनयभंग’, ‘अपहरण’, ‘बलात्कार आणि लैंगिक अत्याचार’, ‘पॉक्सो कायदा’ या विषयावर मार्गदर्शन केले. अॅड.वर्षा एकनाथ देवरे, सदस्य तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी ‘लग्न आणि घटस्फोट कायदा’, ‘देखभाल कायदा’, ‘महिलांना संपत्तीचा अधिकार’, ‘काैटुंबिक हिंसाचार’, ‘गर्भलिंग निवड प्रतिबंध कायदा’ व ‘वैद्यकीय गर्भपात कायदा’ या विषयावर मार्गदर्शन केले. अॅड.इशरत फिरोज खान, सदस्य तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी ‘कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचारापासून महिलांचे संरक्षण’, ‘समान वेतन कायदा व महिलांचे पुनरात्पादक आरोग्याचे अधिकार’ या विषयावर मार्गदर्शन केले. श्री.रमेश पोतदार, पी.एल.व्ही., विधी सेवा समिती, चाळीसगांव यांनी महिला व देशभक्तीपर गीत सादर केले. तसेच अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर चाळीसगाव श्री.एन.के.वाळके यांनी आपले अध्यक्षीय भाषणात पुरुषांनी स्त्रीयांचा सन्मान करावा तसेच ‘महिलांचे सर्वांगीण विकासासाठी कायद्याने दिलेले हक्क अधिकार याची माहिती असायला हवी आणि त्याच अनुषंगाने अशा शिबीरांचे माध्यमातून तालुका विधी सेवा समिती माहिती पुरवित असते. तसेच समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती व जमाती, दिव्यांग, मजुर, आदिवासी, बालक, महिला व मागासवर्गीय तसेच वरिष्ठ नागरिक यांना विधी सहाय्य मिळविण्यासाठी विधी सेवा समितीकडे अर्ज करता येतो व विधी सहाय्यक मिळविता येते असेही मार्गदर्शन केले. तसेच प्रश्नोउत्तरांच्या माध्यमातून उपस्थित महिलांशी संवाद साधला. सदर कार्यक्रमास अॅड.एच.एल.करंदीकर, उपाध्यक्ष तालुका वकील संघ चाळीसगाव, अॅड.ओ.एस.शर्मा, सदस्य तालुका वकील संघ चाळीसगाव, अॅड.पी.एस.एरंंडे, सदस्य तालुका वकील संघ चाळीसगाव, अॅड.संग्रामसिंग शिंदे, सदस्य तालुका वकील संघ चाळीसगाव, सरपंच, पोलीस पाटील तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ.प्रशांत एरंडे, श्री.धनंजय मांडोळे, श्री. धर्मराज भवर, श्री.सागर बोराडे इ. मान्यवर उपस्थित होते. तालुका विधीसेवा समिती तर्फे कार्यक्रमाचे आयोजन श्री.डी.के.पवार व.लिपीक व श्री. के.डी.पाटील यांनी पाहिले. अॅड.श्री.वाय.के.पाटील सदस्य तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केेले व कार्यक्रमाची सांगता केली.
तलाठ्यासह कोतवालाची लाचखोरी जळगाव एसीबीच्या जाळ्यात;चाळीसगाव तालुक्यातील घटना