पाचोरा(वार्ताहर) दि,५
भडगाव तालुक्यातील आमडदे येथे वाळूने भरलेले भरधाव ट्रॅक्टर भल्या पहाटे नागरी वस्तीमध्ये शिरल्याने झालेल्या दुर्घटनेत एका ११ वर्षीय बलिकेचा नाहक बळी गेल्याची दुर्दवी घटना घडली असून यात सदर बालिकेची आजी बानुबाई वाघ वय ४० तर मयत बालिकेची बहीण पिंकी सोनवणे वय ५ या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांचे दोघांचे पाय फ्रॅक्चर झाले असून त्यांना भडगाव शहरातील समर्पण हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे तालुका पुन्हा एकदा हादरला आहे.दरम्यान ट्रॅक्टर चालक पिंटू(पूर्ण नाव माहीत नाही) याला भडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून ट्रॅक्टर नेमके कोणाच्या मालकीचे होते याबाबत अद्याप खुलासा होऊ शकला नाही.
दरम्यान भिल्ल समाज संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शेकडो महिला व पुरुषांचा जमाव भडगाव पोलीस स्टेशनला जमला असल्याची माहिती मिळाली आहे.तर जोपर्यंत या घटनेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत मयत बाकिकेवर अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा भिल्ल समाज संघटनेचे सुधाकर वाघ यांचे सह पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी भोसले यांचेसह भिल्ल समाज बांधवानी घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.
या बाबत पुढील माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील आमडदे येथे आज दि ५ रोजी सकाळी सुमारे सव्वा पाच वाजेच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर गावातील गणपती नगरातल्या वस्तीमध्ये शिरले.अनियंत्रित झालेल्या या भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेमुळे इयत्ता चौथी मध्ये शिकणारी बालिका कु.वैशाली बालु सोनवणे वय ११ ही जागीच ठार झाली तर शेजारील बानुबाई वाघ वय ४० या गंभीर जखमी झाल्या आहेत तसेच मयत वैशाली सोनवणे या बलिकेची लहान बहीण कु.पिंकी बालू सोनवणे वय ५ हि बालिका देखील गंभीर जखमी झाली आहे. तसेच या घटनेत तीन-चार कच्ची घरे देखील उध्वस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. मयत वैशाली हिचे आई वडील बाँबरुड येथे मोलमजुरीचे कामे करतात तर वैशाली व तिची लहान बहीण पिंकी या आमडदे येथे आजी सोबत राहत होत्या.
भडगाव व पाचोरा परिसरातून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी होत असते. अशाच प्रकारे वाळूची चोरटी वाहतूक करत वेगाने जाणारे ट्रॅक्टर हे आमडदे येथील या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने मोठा आवाज झाला. तसेच यात जखमी झालेल्यांनी आक्रोश केला. यामुळे परिसरातून लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. या भागात कच्चे बांधकाम केलेले घरे असल्याने ट्रॅक्टरच्या धडकेत ते कोसळून पडले व यातील काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. यातील जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. या प्रकारामुळे नाहक एका निरपराध चिमुकलीचा बळी गेला आहे.
दरम्यान, या भयंकर घटनेमुळे परिसरातील वाळू तस्करीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून तालुक्यातूनन अतिशय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
शालोपयोगी वस्तू वाटपाचा गरजू विद्यार्थ्यांना दिलासा -आकाश नन्नवरेंचा वाढदिवशी उपक्रम
काकनबर्डी येथील खंडोबा मंदिर परिसराचा होणार कायापालट ; पर्यटन विकासासाठी पाच कोटींना मान्यता आ. किशोर अप्पा पाटील