औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील जोगेश्वरी अपंग विद्यालयात मोफत प्रवेशाचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण संस्थेत तारतंत्री आणि वेल्डर कम फेब्रिकेटर या दोन अभ्यासक्रमांसाठी प्रत्यकी 25 अश्या एकूण 50 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
तारतंत्री ट्रेड साठी इयत्ता सातवी पास तर वेल्डर कम फेब्रिकेटर ट्रेड साठी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था संस्थेतर्फे वसतिगृहात करण्यात येणार आहे तरी पात्र अपंग विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन संस्थेचे प्राचार्य के आर तोमर व वसतिगृह अधीक्षक विलास लोखंडे यांनी केले असून अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 9423155093 या क्रमांकावर संपर्क करावा असे कळवले आहे.
मानसिंगकानगर कडे जाणारा मुख्य रस्ता दुरुस्त करा ; स्थानिक राहिवाश्यांचे पालिकेला निवेदन