आज दिनांक १४ जुलै शुक्रवार रोजी माहेश्वरी विद्या प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय प्रतापनगर जळगाव येथे ॲड. बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठान , भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयातील ६०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा याप्रमाणे एकूण ३ हजार ६०० मोफत वह्या तसेच लेखन साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ॲड. बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आयोजक श्याम कोगटा संस्थेचे उपाध्यक्ष संजय बिर्ला सचिव विनोद कासट, शालेय समिती चेअरमन विनोद बियाणी शासकीय अभियांत्रिकी विद्यालयाचे माजी प्राचार्य संजय दहाड संस्थेचे सदस्य ॲड राजेंद्र प्रसाद माहेश्वरी, अशोक जाजू मनीष झवर, जिल्हा सचिव माहेश्वरी समाज योगेश कलंत्री ,रोहित श्याम कोगटा, कवियत्री मायाताई धुप्पड यांची प्रमुख उपस्थिती होती .
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष श्याम कोगटा व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक हेमंत पाटील व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सरोज तिवारी यांनी केले .अध्यक्ष शाम कोगटा यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना संबोधित करत शहरातील प्रत्येक विद्यार्थी शिक्षण व शैक्षणिक साहित्य पासून वंचित राहणार नाही त्यांचे शिक्षण थांबणार नाही यासाठी गेल्या तब्बल ३१ वर्षापासून सदर उपक्रम अविरत राबवित आहोत व इतक्या मोठ्या प्रमाणात हे कार्य पोहोचले असून हे सर्व उद्योगपती अशोक भाऊ जैन यांच्या दातृत्वातून शक्य होत आहे आपल्या विद्यालयातील कोणताही विदयार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी मदत केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी साळुंखे व आभार दिप्ती नारखेडे यांनी केले कार्यक्रमासाठी बहुसंख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले.
गाळण येथील वसंतराव नाईक आश्रमशाळेत 6 जागतिक लोकसंख्या दिन साजरा