जळगाव- सप्तरंग मराठी आणि कर्तव्य बहुउद्देशीय संस्था यांच्यातर्फे खानदेशातील विविध क्षेत्रांत चांगली कामगिरी करणार्या २५ व्यक्तींना खानदेश ऑफ दि इयर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात विशाल नेवे यांना कृषी उद्योजक पुरस्कार अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी अॅड. संजय राणे, डॉ. नीलेश चांडक, धनाजी नाना विद्याप्रबोधिनीचे डॉ. पी. आर. चौधरी यांची विशेष उपस्थिती होती. नेवे यांनी शेतकर्यांचे सुंदर भविष्य व त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने आत्मनिर्भर कृषी प्रोड्युसर कंपनी स्थापन करीत, कंपनीच्या माध्यमातून शेतकर्यांना बियाणे वाटप, उत्पादनात वाढीच्या दृष्टीने नियोजन व उत्पादनखर्च कमी कसा करता येईल यासंदर्भात मार्गदर्शन केले. शेतकरी हा उद्योजक व गुंतवणूकदार व्हावा, आत्मनिर्भर होऊन उद्योजकता वाढावी, यासाठी ते नेहमी प्रयत्नशील आहेत. याची जळगाव येथे सप्तरंग मराठी व कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित सोहळ्यात विशाल नेवे यांना कृषी उद्योजक पुरस्कार प्रदान करताना अभिनेत्री भार्गवी चिरमुले दखल घेऊन नेवे यांना कृषी उद्योजक पुरस्कार देण्यात आला. अपूर्वा वाणी यांनी सूत्रसंचालन केले.
मोफत वह्या व लेखन साहित्य वाटप कार्यक्रम अभिनव विद्यालय येथे संपन्न.