दिनांक 19 ऑगस्ट रोजी पाचोरा तालुक्यातील व शहरातील सर्व फोटोग्राफर(Photographer) एकत्रित येऊन जागतिक छायाचित्र दिन साजरा करण्यात आला त्यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष धनराज सोनार तर वर्ष फोटोग्राफर राजूभाऊ धनराळे सागर सर भगवती फोटोचे संचालक सेवक शेठ विनोद व्हिडिओ लॅब चे संचालक विनोद शेठ व असंख्य फोटोग्राफर उपस्थित होते त्यावेळी प्रथम कॅमेरे पूजन करण्यात आले व संदीप बोरसे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली सर्व वरिष्ठ फोटोग्राफरनी अपडेट कसे व्हावे सोशल मीडियाचा कसा वापर करावा व वेडिंग शूट करताना आपण काय काय जबाबदाऱ्या केल्या पाहिजे याबद्दल संबोधित केले आणि सिक्युरिटी म्हणून स्वतःचा विमा काढावा यावर देखील तिथे संबोध करण्यात आले आणि विम्याचे फायदे पण सांगितले नंतर सर्वानुमते बैठक घेण्यात आली व अध्यक्ष म्हणून सुनील महाजन तर उपाध्यक्षपदी संदीप बोरसे आणि सचिव पदी संदीप गायकवाड तर कार्याध्यक्षपदी किशोर भोसले आणि खजिनदार म्हणून पप्पू चित्ते यांची नियुक्ती करण्यात आली आभार प्रदर्शन आतिश सुतार यांनी केले त्यावेळी उपस्थित वरिष्ठ मान्यवर व सर्व तालुका व शहर फोटोग्राफर होते.
हे देखील वाचा…
जिल्ह्यातील दोघांवर स्थानबद्धतेची कारवाई ; कारागृहात रवानगी
गोंडगाव बालिकेला न्याय द्या ! सकल मराठा समाजाची मंत्रालयावर धडक