नाशिक :(Nasik) शहरातील आरटीओ रोड परिसरात चैन स्नॅचिंगची (chain snatching) धक्कादायक घटना घडली असून केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या आईंना भररस्त्यात लुटलं गेल्याने घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी भारती पवार यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या (Central Minister) आईला अशाप्रकारे भररस्त्यात लुटल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास भारती पवार यांच्या आई भाजी खरेदी करण्यासाठी घरापासून काही अंतरावर गेल्या होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावली आहे.ऐवज हिसकावल्यानंतर आरोपींनी त्वरित घटनास्थळावरून पळ काढला.हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर नाशिक शहरातील म्हसरुळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळत आहे. पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींची अद्याप ओळख पटली नसून घटनेचा तपास सुरू आहे.मागील काही दिवसात नाशिक शहरात चेन स्नॅचिंगच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, शनिवारी सायंकाळी साखळी चोरांनी थेट केंद्रीय मंत्र्यांच्या आईलाच लक्ष्य केल्याने शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हे देखील वाचा…
पाचोरा फोटोग्राफर असोसिएशन च्या अध्यक्षपदी सुनील महाजन तर उपाध्यक्षपदी संदीप बोरसे
जिल्ह्यातील दोघांवर स्थानबद्धतेची कारवाई ; कारागृहात रवानगी
गोंडगाव बालिकेला न्याय द्या ! सकल मराठा समाजाची मंत्रालयावर धडक
अवैध वाळू वाहतूक-धडक कारवाईत ५३ ट्रॅक्टर ट्रॉली सह १४ डंपर जप्त