strong>जळगाव –
ऐन सणासुदीच्या काळात रेल्वे प्रशासनाकडून पुन्हा 29 ते 31 ऑगस्टदरम्यान 14 गाड्या रद्द करून प्रवाशांना झटका देण्यात आला आहे. एकाच महिन्यात रेल्वे(Railway) प्रशासनाकडून तिसर्यांदा मेगा ब्लॉक घेण्यात आला असून, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. रेल्वे विभागात मूर्तिजापूर येथील स्थानकात डाउन मार्गावर लांब पल्ल्याच्या लूपच्या कामासाठी हा पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे. 30 ऑगस्टला सायंकाळी सहापासून 31 ऑगस्टला दुपारी दोनपर्यंत हे काम सुरू राहणार आहे.
रेल्वे प्रशासनाकडून खर्च वाचविण्यासाठी दोन मालगाड्या एकत्र जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भुसावळ(Bhusawal) आणि नागपूर(Nagpur) विभागात दोन मालगाड्यांचे संयोजन केलेल्या लांब पल्ल्याच्या 100 वॅगन धावतात. अशा प्रकारे एकाच वेळी आणि एकाच मार्गावर दोन मालगाड्या चालविणे शक्य आहे. ज्यामुळे दुसर्या गाडीच्या वेळेची आणि मार्गाची बचत होते. त्यामुळे मूर्तिजापूरमध्ये लांब लूप मार्ग बांधण्याची योजना आखण्यात आली. जेणेकरून अशा लांब पल्ल्याच्या मालगाड्या चालविताना, मेल-एक्स्प्रेस गाड्यांना प्राधान्य देता येईल. त्यामुळे सर्वच गाड्यांची वेळ वाचविण्यात मदत होईल. त्यासाठी मूर्तिजापूर स्थानकात लांब पल्ल्याच्या वळणाच्या बांधकामासाठी ब्लॉक घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
भुसावळ विभागातून रद्द झालेल्या गाड्या रद्द ः काचेगुडा-नरखेड एक्स्प्रेस (30 ऑगस्ट), नरखेड-काचेगुडा एक्स्प्रेस (31 ऑगस्ट), लोकमान्य टिळक टर्मिनस- बल्हारशाह विशेष (29 ऑगस्ट), बल्हारशाह- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (30 ऑगस्ट), भुसावळ- वर्धा एक्स्प्रेस (30 ऑगस्ट), वर्धा-भुसावळ एक्स्प्रेस (31 ऑगस्ट), पुणे-अमरावती एक्स्प्रेस (30 ऑगस्ट), अमरावती-पुणे एक्स्प्रेस (31 ऑगस्ट), भुसावळ-बडनेरा पॅसेंजर विशेष (31 ऑगस्ट), बडनेरा- भुसावळ पॅसेंजर विशेष (31 ऑगस्ट), मुंबई-अमरावती एक्स्प्रेस (30 ऑगस्ट), अमरावती-मुंबई एक्स्प्रेस (30 ऑगस्ट), नागपूर-पुणे एक्स्प्रेस (30 ऑगस्ट), पुणे- नागपूर एक्स्प्रेस (31 ऑगस्ट).
हे देखील वाचा…
चैन स्नॅचिंग- केंद्रीय मंत्र्यांच्या आईला केले लक्ष्य -कायदा सुव्यवस्था ऐरणीवर
पाचोरा फोटोग्राफर असोसिएशन च्या अध्यक्षपदी सुनील महाजन तर उपाध्यक्षपदी संदीप बोरसे
अवैध वाळू वाहतूक-धडक कारवाईत ५३ ट्रॅक्टर ट्रॉली सह १४ डंपर जप्त