सेवाभाव,दातृत्व, कर्तृत्व, मैत्री अशा अनेक विशेषनांनी ज्यांची ओळख होते असे पाचोरा शहरातील सुपरिचित व्यक्तिमत्व, प्रसिद्ध उद्योगपती ,बिल्डर्स तसेच आशीर्वाद इन्फ्राचे संचालक मुकुंद बिल्दीकर यांनी सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या दातृत्वाचा परिचय देत शहरातील काही भागात दिवाळी निमित्त शुभेच्छा कार्ड व मिठाईचे वाटप केले आहे. शहरातील जनता वसाहत, नागसेन नगर, मानसिंगका नगर, मिलिंद नगर, विवेकानंद नगर, थेपडे नगर,भवानी नगर, जंगी मोहल्ला, हनुमान नगर, आशीर्वाद रेसिडनसी, पाटील वाडा आदी भागातील नागरिक बंधू भगिनी यांना घरपोच दिवाळी शुभेच्छा कार्ड व दिवाळी मिठाईचे सुमारे सात ते आठ हजार पाकिटांचे वाटप केल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला तर काहींनी याचा राजकीय अर्थ काढत ते आगामी नगरपालिका निवडणुकीची तयारी करत असल्याचा सुरू व्यक्त केला.
मुकुंद बिल्दीकर हे अमळनेर येथील श्री सखाराम महाराज यांचे निस्सीम भक्त असून आपल्याला जनतेच्या आनंदात व सेवेत आनंद मिळत असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवत नागरिकांनी माझ्या प्रेमाचा स्वीकार करावा असे आवाहन केले आहे.
मुकुंद बिल्डींकर हे आमदार किशोर अप्पा पाटील यांचे जिवलग मित्र असून यांनी आपल्या स्वभावामुळे शहरासह तालुक्यात व जिल्ह्यात मोठा मित्रपरिवार व गोतावळा निर्माण केला असून त्यांनी अनेकांशी राजकारणा पलीकडे संबंध प्रस्थापित केले आहेत.त्यामुळे सर्वांच्या सुख दुःखात हवा हवा सा वाटणार त्यांचा सहवास अनेकांना त्यांच्या या उन्मत व्यक्तिमत्वाची प्रचिती देणारा ठरत आला आहे.