पाचोरा वार्ताहर
चांदवड ते जळगाव यादरम्यान बनवण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यावर योग्य जागी गतिरोधक व सुरक्षेचे उपाय नसल्यामुळे पाचोरा शहरानजीक अपघातांची मालिका सुरू असून काल झालेल्या अपघातात राजू शेलार याचा दुर्दैव मृत्यू झाला आहे. ही घटना भारत डेअरी बस स्टॉप जवळ काल सायंकाळी घडली आहे.
शहरातील कृष्णापुरी येथील रहिवासी असलेले राजू शेलार हे पत्नी व मुलाला घेऊन भारत डेअरी बस स्टॉप जवळ शहरात प्रवेश करत असताना भरधाव येणाऱ्या दुधाच्या टँकरने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला यामध्ये गंभीर जखमी झालेल्या राजु शेलार यांना उपचाराकरता स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले होते. अपघातात अति रक्तस्त्र झाल्याने उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुस्वभावी व मित्र वर्गात प्रिय असलेल्या राजू शेलार यांच्या अपघाताच्या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात आली.पाचोरा शहरापासून भडगाव तसेच जळगाव दिशेने पाच किलोमीटर अंतरापर्यंत मोठी रहदारी असते त्यातच योग्य जागी गतिरोधक नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे तर पावसाळ्याच्या दिवसात कुत्रे आणि मोकाट जनावरे रस्त्यावरच येऊन बसत असल्याने देखील अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे प्रशासनाने यावर गांभीर्य लक्ष देऊन संपूर्ण रस्त्यावरती सुरक्षात्मक उपायांची योजना करावी अशी मागणी होत आहे
हे देखील वाचा…
राज्यातील 50 हजार गोविंदांना 10 लाख रुपयांपर्यंत विमासंरक्षण
भुसावळ विभागातील ‘या’ रेल्वे गाड्या रद्द; प्रवाश्यांची होणार गैरसोय