जळगांव प्रतिनिधि
फेब्रु ,मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) लेखी परीक्षा (Board Exam) खालील कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.
१) तपशील
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) लेखी परीक्षा कालावधी (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम बुधवार, दि. २१ फेब्रुवारी, २०२४ ते शनिवार, दि. २३ मार्च २०२४
२)माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा( इयत्ता १० वी) शुक्रवार दि. ०१ मार्च २०२४ ते शुक्रवार दि. २२ मार्च २०२४ उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर दि. २८/०८/२०२३ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
शाळा / कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.
सदर इ. १२ वी व इ. १० वीच्या परीक्षा प्रचलित पध्दतीनुसार आयोजित करण्यात येतील याची सर्व कनिष्ठ महाविद्यालये व माध्यमिक शाळा, विद्यार्थी, शिक्षक, पालक व संबंधीत घटकांनी नोंद घ्यावी.
मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांचकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये.
प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल.
सदर वेळापत्रकांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसाच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात. तद्नंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विचार केला जाणार नाही.
उपरोक्त बाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.असे अहवान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११ ००४. यांच्या यांच्यामार्फत प्रकटनाद्वारे (दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी) करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाचोरा शाखेकडून दि ३ सप्टेंबर रविवार रोजी पत्रकारांना मोफत रेणकोट,छत्री ,वाषीॅक विमा
आ.किशोर अप्पा पाटील यांच्या हस्ते पाचोऱ्यात रविवारी ७ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन; शहर विकासात पडणार भर
बहिणाबाईंचे काव्य मराठी साहित्यातील अक्षरलेणे – डॉ. अतुल देशमुख