पाचोरा तालुक्यातील मोंढाळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत हिंदुस्थान फिड्सच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या प्राथमीक शाळा मोंढाळे ता.पाचोरा जिल्हा जळगाव येथे फिड्स श्रीरामपूर कॅटल फिड्स प्रा.लिमिटेड ) कंपनीच्या वतीने विद्यार्थ्यांना सी.एस.आर.फंडातून शाळेतील मुलांना शालेय साहित्य वह्या वाटप करण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाचे औचित्य साधून या कार्यक्रमासाठी कंपनीचे सेल्स ऑफिसर तुषार बाविस्कर (पाटील) व श्री.सुदाम वाघ (वाघ डेरी -खडकदेवळा ) यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील विद्यार्थ्यांना वह्याचा लाभ मिळाला असून त्यांच्या या मोलाच्या सहकार्याबद्दल शाळेच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील सरपंच सौ.कल्पना पुंड, श्री.पंडित गायकवाड-उपसरपंच, श्री.नवीन पाटील-पोलीस पाटील, श्री.रवींद्र पाटील, डॉ. श्री.गणेश पाटील, श्री.तुकाराम महाराज शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य तसेच मुख्याध्यापक, शिक्षकवृंद त्याच बरोबर परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. भागवत कोरे सरांनी केले तर उपस्थित्यांचे आभार मुख्याध्यापक श्री. मनोहर सोनवणे यांनी मानले.
आदिवासी आश्रमशाळेतील क्रीडाशिक्षकाविनाच क्रीडा दिन !
माध्यमिक उच्च माध्यमिक शालांत परीक्षा ( इयत्ता १० वी व इयत्ता १२) वर्गासाठी होणाऱ्या परीक्षेसाठी बोर्डाच्या संभाव्य तारखा जाहीर
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाचोरा शाखेकडून दि ३ सप्टेंबर रविवार रोजी पत्रकारांना मोफत रेणकोट,छत्री ,वाषीॅक विमा