पाचोरा(वार्ताहर)दि,३१
पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत वरखेडी, भडगाव, नगरदेवळा या उपबाजार परिसरात गुरांचे आठवडी बाजार नियमित भरत असतात. परंतु सदरचा लंपी स्किन डीसीज (Lumpy Skin Disease) हा आजार प्रामुख्याने गोवशीय जनावरे ( गाई व बेल) या मध्येच आढळून येत आहे. सदरचा आजार हा म्हैस वर्गीय व शेळी मेंढ्यामध्ये आढळून येत नाही. असे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे पाचोरा व भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या गुरांचे आठवडी बाजारात म्हैस वर्गीय व शेळी मेंढ्या खरेदी विक्रीचे व्यवहार शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरु ठेवणेबाबत आपल्या स्थरावरून आम्हास परवानगी द्यावी अशा मागणीचे निवेदन पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.याबाबत त्यांनी आमदार किशोर अप्पा पाटील यांना निवेदन दिले. दरम्यान आपण शेतकरी बांधवांचे होणारे नुकसान लक्षात घेता आपण भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे आ.किशोर पाटील यांनी म्हटले आहे.
पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या गुरांचे बाजार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जा. क्र. जिल्हाधिकारी/आपत्ती व्यवस्थापन/ आदेश/१५७०-८२/२०२३, जळगाव दि. २३/०८/२०२३ रोजी प्राप्त झालेल्या आदेशामुळे बंद ठेवण्यात आले आहेत.
वरील आदेशानुसार चाळीसगाव, पाचोरा, भडगाव तालुक्यात जनावरांमध्ये लंपी स्किन डीसीज (Lumpy Skin Disease) या साथ रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. त्या अनुषंगाने प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा कार्यक्षेत्राअंतर्गत उपबाजार वरखेडी, नगरदेवळा व भडगाव येथील गुरांचे बाजार (खरेदी विक्रीचे व्यवहार) बंद करण्याबाबत सूचना निर्गमित केलेल्या होत्या त्यानुसार बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व प्रकारचे जनावरांचे खरेदी विक्रीचे आठवडी बाजार बंद केलेले आहेत. मात्र सद्याचा काळ हा शेतकन्यांसाठी अत्यंत महत्वाचा व शेतीच्या मशागतीचा आहे. तसेच याच हंगामात शेतकरी मोठ्याप्रमाणात दुग्ध व्यवसाय करण्यासाठी गायी, म्हशी शेळ्या यांची खरेदी विक्री करीत असतात.
चंद्रयान 3 यशस्वी लँडिंगनंतर आता सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोची आदित्य L1 मोहीम
पाचोरा जि.प.शाळेत शालेय साहित्य वाटप!
आदिवासी आश्रमशाळेतील क्रीडाशिक्षकाविनाच क्रीडा दिन !