पाचोरा(वार्ताहर) दि,५
लंपी स्किन डिसीजच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशाने दि २८ ऑगस्ट पासून बंद असलेले पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रातील वरखेडी व नगरदेवळा येथील गुरांचे बाजार ४ सप्टेंबर पासून पूर्ववत सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे मात्र पुढील आदेशा पर्यंत गोवंशीय गुरांचा बाजार ( गाय बैल पारडू ) मात्र भरणार नसून केवळ शेळी मेंढी व म्हशी यांच्याच खरेदी विक्रीला परवानगी दिली आहे.
बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी व व्यापारी यांच्या मागणीनुसार बाजार समितीचे सभापती गणेश पाटील यांनी पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्फत जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे म्हशी व शेळी मेंढीचे बाजार पूर्ववत चालू करावेत यासाठी वेळोवेळी पाठपुरवठा केला होता.
दरम्यान दिनांक ०४ सप्टेंबर रोजी किशोर आप्पा पाटील यांच्या समवेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची प्रत्यक्ष भेट घेत या विषयाबाबत चर्चा करून शेळी मेंढी व म्हशी यांचे गुरांचे बाजार चालू होण्यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी मिळवली आहे.
बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतकरी व व्यापारी बांधवांनी बाजार समितीचे वरखेडी व नगरदेवळा येथील गुरांचे बाजार गो वंशीय जनावरे( बैल व गाय )सोडून म्हशी व शेळी मेंढ्यांचे बाजार पूर्ववत सुरू चालू झाले आहेत तरी सर्व शेतकरी व्यापारी बांधवांनी आपली गोवंशीय जनावरे सोडून बाजार समितीत विक्रीस आणावे असे आवाहन करण्यात आले असून सदर गुरांचे बाजार केवळ शेतकरी हितासाठी चालू केल्यामुळे शेतकरी व व्यापारी वर्गातून आमदार किशोर आप्पा पाटील तसेच बाजार समितीचे सभापती, उपसभापती व सर्व संचालक मंडळ यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे .
मात्र गोवंशीय गुरांचा बाजार ( गाय बैल पारडू ) पुढील आदेश होईपर्यंत बंद राहील याची नोंद घ्यावी कोणीही गोवंशीय पशुधन बाजारात किंवा परिसरात आणू नाही अन्यथा दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असा इशारा देखीम सभापती गणेश पाटील यांनी दिला आहे.
पाचोरा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ लांडेंची लबाडी- ५० हजाराची लाच मागितल्या प्रकरणी एसीबीच्या जाळ्यात
दोन सख्या भावांसह एकाच रात्रीत तिघांचा खून; जिल्ह्यात खळबळ
म्हैसवर्गीय जनावरे बकरी,शेळी, मेंढी बाजार पूर्ववत सुरू करण्याची परवानगी द्या- सभापती गणेश पाटील