सातगाव डों. आश्रमशाळेचे प्रकल्पस्तरीय क्रीड़ा स्पर्धेत यश
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत घेण्यात आलेल्या
एकलव्य प्रकल्पस्तरीय क्रीडा महोत्सव 2023 (सत्रासेन) क्रीड़ा स्पर्धेत सातगाव डोंगरी आश्रमशाळेतील खेळाडूंनी विविध सांघिक आणि वैयक्तिक क्रीड़ा प्रकारात घवघवीत यश मिळविले असून शाळेतील विजयी खेळाडूंची नासिक विभागीय स्तरावर यशस्वी निवड झाली आहे.
स्पर्धेत विजयी खेळाडूंना
आदिवासी विकास विभाग नासिक येथील अप्पर आयुक्त संदीप गोलाईत,
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल येथील प्रकल्प अधिकारी अरुण पवार ,
जिल्हा क्रीड़ा अधिकारी जळगांव, येथील राजेंद्र नाईक ,
सहाय्यक प्रकल्प अधिकारी यावल येथील पवन पाटील
विस्तार अधिकारी चाळीसगाव येथील एल एम पाटील
यांनी करंडक व पदक देऊन सन्मानित केले.
खेळाडूंचे पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ,
चेअरमन संजय वाघ,
स्थानिक शालेय समिति चेअरमन प्रा. भागवत महालपुरे ,प्रा.मुख्याध्यापक आर.बी.पवार
मा.मुख्याध्यापक यु.एस.मनगटे
यांनी कौतुक केले.
क्रीड़ा शिक्षक म्हणून
आकाश महालपुरे,
अक्षय भालेराव, सरला परदेशी , ओ.डी.शेंडे यांनी मार्गदर्शन केले.
विजयी खेळाडूंचे निकाल पुढिल प्रमाणे –
1) रविता अक्करसिंग पावरा
– लांबउडी प्रथम
2) प्रदीप रेमा बारेला
– लांबउडी प्रथम
3) पवन सर्किलाल पावरा
– लांबउडी द्वितीय
4) दिनेश मुरल्या पावरा
– गोळाफेक द्वितीय
14 वर्षा आतील व्हॉलिबॉल संघ प्रथम क्रमांकाने विजयी…
सर्व खेळाडुंची नासिक विभागीयस्तरावर निवड करण्यात आली आहे.
पाचोरा महर्षि वाल्मीक ऋषि जयंती निमित्त प्रतिमा पूजन