अशोक जैन ( जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष) यांच्या वाढदिवसानिमित्त श्याम कोगटा यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या व लेखन शालेय साहित्य वाटपाचे आयोजन
जळगाव प्रतिनिधी
( संतोष सपकाळे)
आज दिनांक 10 फेब्रुवारी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनव विद्यालय प्रतापनगर आणि श्रीमती जानकीबाई
आनंदरामजी बाहेती विद्यालय महाबळ येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन शाम कोगटा यांनी केले
मागील पंधरा वर्षापासून ( कोविड काळामध्ये सुद्धा) अविरत प्रत्येक वर्षी कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहे.
आतापर्यंत जळगाव शहरातील लाखो विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला आहे.
अभिनव तसेच बाहेती दोन्ही विद्यालयातील इ. 1 ली ते 10 वी सुमारे 1100 विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यात प्रत्येकी 6 वह्या, 2 पेन, 2 पेन्सिल समावेश होता. कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर ॲड. बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठानचे अध्यक्ष क्रीडा शिक्षण संचालक शाम कोगटा, संजय बिर्ला, विनोद बियाणी , नंदलाल गादिया , क्रीडा रसिक संचालक नितीन बरडे ,अजिंक्य तोतला, रोहित कोगटा ,अतुल कोगटा अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक सरोज तिवारी तसेच बाहेती विद्यालयाचे मुख्याध्यापक पी .आर. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि स्व. ॲड.बबनभाऊ बाहेती यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. प्रास्ताविक शामभाऊ कोगटा यांनी केले. नंदलाल गादिया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले .