जळगाव , दि. 10 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 (LOKSABHA ELECTION 2024) कार्यक्रमानुसार जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे.निवडणूक प्रक्रिया खुल्या, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मतदान कालावधी संपण्याच्या 48 तास अगोदरपासून ते मतदान संपेपर्यंत जिल्ह्यातील मद्यविक्री पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
निवडणूक कालावधीत मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी 48 तासापासून म्हणजेच 11 मे 2024 रोजीच्या सायंकाळी 6 वाजेपासून, मतदानापूर्वीचा एक दिवस म्हणजेच 12 मे 2024 आणि 13 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत मद्यविक्री बंद राहील. या आदेशाचे बंद कालावधीत उल्लंघन करुन मद्य विक्री करीत असल्याचे आढळून येणाऱ्या संबंधित परवानाधारकांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात येतील, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे.
सुरेशदादा जैन यांचा शिवसेनेचा प्राथमिक सदस्यतेचा राजीनामा
राष्ट्रवादीचे संजय वाघ महायुतीच्या प्रचारात सक्रिय होणार? महाविकास आघाडीला धक्का – मंत्री अनिल पाटील यांची यशस्वी शिष्टाई
पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भविष्य; पाचोर्यात जाहीर सभा