जळगाव लोकसभेत आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी सुमारे 1 लाख 8 हजाराच्या फरकाने आघाडी घेतली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार करण पवार यांची पिछेहाट समोर आली आहे.
जळगावमधून स्मिता वाघ यांना आतापर्यंत 235598 मते मिळाली आहे, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार करण पाटील-पवार यांना 127398 मते मिळाली आहेत.
मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांपासूनच भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी आघाडी घेतली असून, ती अद्याप कायम आहे. जळगावची जागा भाजप नेते गिरीश महाजन व शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेश पाटील यांनी खूपच प्रतिष्ठेची केली
आहे. त्यामुळे या जागेच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
पाचोरा येथील बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल ची दरवर्षी प्रमाणे शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम