दिनांक 14 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर (वेळ सकाळी 10 ते 5) दरम्यान अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्रंबकेश्वर यांच्या सद्गुरु मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल द्वारा आरोग्य दूत योजनेअंतर्गत पाचोरा तालुक्यातील 16 गावांत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे.
हृदयविकार, मधुमेह, ब्लडप्रेशर, कावीळ, पोटाचे आजार, कॅन्सर, संधिवात, मनोविकार, दंतविकार, त्वचारोग, मुळव्याध, मुतखडा, स्त्रियांचे आजार, लहान मुलांचे आजार, जुनाट आजार इत्यादी रोगांचे तज्ज्ञ डॉक्टरांद्वारा मोफत निदान केले जाणार आहे. तसेच,माफक दरात आयुर्वेदिक औषधे उपलब्ध असणार आहेत.
दि. 14 नोव्हेंबर 22 रोजी गिरड व भातखंडा, दि. 15 नोव्हेंबर रोजी खेडगाव नंदीचे, आसनखेडा,दि.16 नोव्हेंबर रोजी बांबरुड (राणिचे) ,कुरंगी, दि.17 नोव्हेंबर रोजी बिल्दि ,कुऱ्हाड,दि.18 नोव्हेंबर रोजी लोहारा, रोटवद,दि.19 नोव्हेंबर रोजी पळाशी, गोंदेगाव, दि.20 नोव्हेंबर रोजी संघवी कॉलनी पाचोरा, नगरदेवळा तर दि. 21 नोव्हेंबर रोजी पिंपरी सार्वे, शिंदाड येथे शिबिर, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात आयोजित करण्यात आलेले आहे.
अधिक माहितीसाठी व शिबिरात नाव नोंदणीकरिता 8275270554 , 8329608667, 9860896336, 9272396624, 7558264846 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा गावातील व परिसरातील गावांच्या सेवेकरी, भाविक व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातर्फे करण्यात आलेले आहे.
गुन्ह्यांवर भारी पडलं वजन,लठ्ठपणामुळे आरोपीला उच्चन्यायालया कडून जामीन मंजूर