जळगाव : जळगावात डंपरने चिरडल्याने तरुणीचा मृत्यू ओढवला तर भाऊ बचावल्याची घटना शहरातील शिव कॉलनी रेल्वे उड्डाण पुलाजवळ मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली आहे.
बँकेत खाते नसल्याने घरात खोदला खड्डा; दरोडेखोरांनी मारला ऐवजावरच डल्ला
डोक्यावरून चाक जाताच तरुणीचा मृत्यू
जळगावकडून धुळ्याकडे जाणारा डंपर (एम.एच.१९ सी.वाय.३३११) हा शिव कॉलनीकडून रेल्वे उड्डाणपुलाकडे जात असताना पुढे जाणारी मोपेड दुचाकी (एम.एच.१९ सी.७१६९) या डंपरने मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर बसलेल्या मनस्वी उर्फ ताऊ सुभाष सोनवणे (२०, रा.खोटे नगर, जळगाव) या तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर तरुणीचा भाऊ नचिकेत सुभाष सोनवणे (२५, रा.खोटे नगर, जळगाव) हा थोडक्यात बचावला. हा अपघात मंगळवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडला.
जिल्हा परिषद अंतर्गत गट क संवर्गासह राज्यशासनातील ८० टक्के रिक्त जागा भरणारअपघाताची माहिती मिळाल्यानंतर शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रामानंद पोलिसांनी राखेने भरलेला डंपर ताब्यात घेतला आहे