एरंडोल तालुक्यातील जवखेडे सीम ग्रामपंचायतचे सरपंच दिनेश जगन्नाथ पाटील यांच्या अपात्रतेच्या आयुक्त नाशिक यांच्या निर्णयास उच्च न्यायालयात स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे त्यांचे सरपंच पद पूर्ववत झाले आहे. शासकीय जागेवर अतिक्रमण केले म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंचांना मार्च २०१२ मध्ये त्यांना अपात्र ठरवले होते. वरील निर्णयाविरुद्ध त्यांनी विभागीय आयुक्त नाशिक यांच्यापुढे अपील दाखल केले होते. त्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला. या निर्णयाविरुद्ध सरपंच यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे अर्ज करून स्थगिती घेतली होती. सरपंच पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन विभागीय आयुक्त नाशिक यांचे व जिल्हाधिकारी यांच्या निर्णयास स्थगिती दिली. त्यामुळे दिनेश पाटील यांचे पद पूर्ववत झाले आहे
शाळेत विद्यार्थ्यांच्या बॅगेत चक्क दारुच्या बाटल्या, सिगारेट आणि कंडोम सापडल्याची धक्कादायक घटना
अनोखा विवाह सोहळा – जुळ्या बहिणींनी निवडला एकच वर