पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी उपस्थित होते. व्ही. टी. जोशी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन व कार्य यावर याचा थोडक्यात आढावा घेतला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन एन गायकवाड, उपप्राचार्य प्रा. एस. आर. पाटील, नॅक समन्वयक डॉ. ए. एन. भंगाळे, भूगोल विभागप्रमुख डॉ. एस. डी. भैसे, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.
जयंती-पुण्यतिथी समितीचे प्रमुख व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. एन. व्ही. चिमणकर यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.
६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिनव विद्यालय येथे बाबासाहेबांना विनम्र अभिवादन
अभिनव विद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा