पाचोरा. (वार्ताहर) येथून जवळच असलेल्या खडकदेवळा बु.|| येथे डॉ. वाय.पी. युवा फॉउंडेशन आणि साईनाथ सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सर्व प्रथम गावातील प्रथम नागरिक पोलीस पाटील एकनाथ कोळी, माजी पोस्टमन मोतीलाल सुर्यवंशी, भिकन देवरे, नाना संतोष निकम, वाचनालयाचे संचालक संजय निकम, विश्वास पाटील, देवचंद गायकवाड, फॉऊंडेंशन चे डॉ यशवंत पाटील या मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण, व दिपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना डॉ. यशवंत पाटील यांनी बाबासाहेबांच्या जिवन कार्याला उजाळा देतांना सांगितले की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू गावी झाला. व त्यांनी आपल्या दिल्ली येथील राहत्या घरी ६ डिसेंबर १९५६ रोजी अखेरचा श्वास घेतला होता म्हणून या दिनालाच महापरिनिर्वाण दिन असे म्हणतात. व नंतर दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबई मधील दादर स्थित चैत्यभूमी येथे बौद्ध धर्मानूसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
राज्यघटना घडवण्यात बाबासाहेबांचा सिंहांचा वाटा होता त्यामुळेच त्यांना संविधानाचा सूत्रधार म्हणून ओळखतात.ते एक महान समाजसुधारक आणि प्रचंड ज्ञानी व अभ्यासक होते. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे क्रांती होते एक धगधगता ज्वालामुखी होते. वंचितांचा, शोषितांचा, दुःखीतांचा, दिन दलीतांचा आवाज होते, अथांग ज्ञानसागराचे महासागर होते, १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी त्यांच्या ५ लाख अनुयांया सोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता.
पाचोरा महाविद्यालयातर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनबाबासाहेबांचा शैक्षणिक प्रवास इतरांच्या तुलनेत सोपा नव्हता तरीही त्यांनी त्यावर मात करून स्पृश्य-अस्पृश्य, जाती-भेद, अज्ञानता, अन्याय-अत्याचार, भेदभाव इ. गोष्टींसाठी आंदोलन करून पुढे येवून लढा दिला. शिक्षणाचा प्रसार केला व दलीतांना इतरांसारखा समान हक्क मिळवून दीला, शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र देवून सांगितले की एक वेळा उपाशी रहा पण शिक्षणाने गरीब राहू नका शिकल्यामुळेच प्रगती होते असे ते शेवटी म्हणाले.
यावेळी भिला ब्राह्मणे यांनी देखील बाबासाहेबांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विश्वास पाटील यांनी तर आभारप्रदर्शन संजय निकम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाचनालयाचे, फॉऊंडेंशन चे आणि ग्रामस्थांचे सहकार्य लाभले
शिक्षण विभाग पंचायत समिती पाचोरा येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा