संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या २० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत पाचोरा तालुका मतदार संघाची जागा आधीच बिनविरोध झाल्याने १९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ३९ उमेदवार रिंगणात होते.या बहुचर्चीत निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या सहकार पॅनलचा धुवा उडाला असून ना.गिरीश महाजन ना गुलाबराव पाटील, आ.मंगेश चव्हाण नेतृत्व करत असलेल्या शेतकरी विकास पॅनलने १६ जागा जिंकत दणदणीत विजय संपादन केला आहे.सहकार पॅनलला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले असून शेतकरी पॅनलने माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी धक्का दिला आहे. यात दूध संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे यांचा देखील मानहानी जनक पराभव झाला असून आमदार मंगेश चव्हाण यांनी मुक्ताईनगरची बाजी मारली आहे.
माजी महसूल मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे विरुद्ध सर्व अशा झालेल्या या निवडणुकीत अखेर शेतकरी पॅनेलची सरशी झाली आहे.
जिल्हा दुध संघात आगामी पंचवार्षिक कालावधीसाठीची निवडणूक मोठ्या प्रमाणात गाजली आहे. यात एकूण २० संचालकांची निवड करण्यात आली असून यात पाचोरा तालुक्यातून आमदार किशोर अप्पा पाटील यांनी जिल्हा बँक निवडणुकीत माजी आमदार दिलीप वाघ यांना पाठिंबा देण्याचा शब्द पाळत निवडणुकीतुन माघार घेत माजी आमदार दिलीप वाघ यांना बिनविरोध निवडून येण्यास साहाय्य केले होते. यामुळे १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात होते. यात प्रामुख्याने महाविकास आघाडीचे सहकार पॅनल आणि महायुतीचे शेतकरी विकास पॅनल यांच्यात सरळ लढत झाली. यातील सहकार पॅनलची धुरा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे तर शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. यात शेतकरी पॅनलमध्ये ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन व पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्यासह आजी-माजी आमदारांचा समावेश होता. तर सहकार पॅनलमध्येही मावळत्या अध्यक्षा मंदाताई खडसे यांच्यासह माजी मंत्री गुलाबराव देवकर,माजी मंत्री सतीश पाटील यांचेसह मातब्बर नेत्यांचा समावेश असल्याने ही निवडणूक चुरशीची झाली. निवडणुकीच्या काळात अनेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.
या निवडणुकीसाठी एकूण ४४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत शंभर टक्के मतदान केले. जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर शनिवारी मतदान झाले. मतदानानंतर दोन्ही पॅनलने विजयाचा दावे प्रतिदावे केले होते.या पार्श्वभूमीवर, रविवारी सकाळी आठ वाजेपासून रिंगरोडवरील सत्यवल्लभ हॉलमध्ये मतमोजणीस प्रारंभ झाला. मतमोजणीसाठी सात टेबल असून 22 कर्मचारी नियुक्त करण्यात आली होती..
सविस्तर निकाल पुढील प्रमाणे-
मुक्ताईनगर मतदार संघ: आ. मंगेश चव्हाण (एकूण मते 255), मंदाकिनी खडसे (एकूण मते 179)
जामनेर मतदार संघ: मंत्री गिरीश महाजन (एकूण मते 276), दिनेश पाटील (एकूण मते 158)
पारोळा मतदार संघ : आ.चिमणराव पाटील (एकूण मते 227), सतीश अण्णा पाटील (एकूण मते 208)
रावेर मतदार संघ : जगदीश बढे (एकूण मते 170) ठकसेन पाटील (एकूण मते 266)
जळगाव मतदार संघ : मालती महाजन (एकूण मते 162), गुलाबराव पाटील ( एकूण मते 275)
एरंडोल मतदार संघ : दगडू चौधरी (एकूण मते 230), अमर जैन ( 205)
भडगाव मतदार संघ : रावसाहेब भोसले (एकूण मते 233), डॉ. संजीव पाटील (एकूण मते 200)
भुसावळ मतदार संघ : शामल झांबरे (एकूण मते 263), शालिनी ढाके (एकूण मते 169)
बोदवड मतदार संघ : ऍड. रवींद्रभैया पाटील ( एकूण मते 216), मधुकर राणे (एकूण मते 220)
चाळीसगाव मतदार संघ : प्रमोद पाटील ( एकूण मते 247), सुभाष पाटील (एकूण मते 188)
चोपडा मतदार संघ : इंदिराबाई पाटील (एकूण मते 164), रोहित निकम (एकूण मते 269)
धरणगाव मतदार संघ : वाल्मिक पाटील (एकूण मते 167), संजय पवार (एकूण मते 269)
अमळनेर मतदार संघ : आ. अनिल पाटील(एकूण मते 246), स्मिता वाघ (एकूण मते 184)
यावल मतदार संघ : हेमराज चौधरी (एकूण मते 168), नितीन चौधरी (एकूण मते 260)
महिला राखीव मतदार संघ: छाया देवकर (एकूण मते 235) पूनम पाटील (एकूण मते -), सुनीता पाटील (एकूण मते 192), उषा पा.(एकूण मते-), मनीषा सूर्यवंशी (एकूण मते -164)
अनु जाती जमाती : ब्रम्हे श्रावण (एकूण मते 161),
आ.संजय सावकारे (276)
वि.जा.भ.ज.वि.मा.प्र. : विजय पाटील (एकूण मते 179), अरविंद देशमुख (एकूण मते 259)
इ.मा.व : गोपाळ भंगाळे (एकूण मते 207), पराग मोरे (एकूण मते 230