माहेश्वरी विद्या प्रसारक मंडळ संचालक अभिनव विद्यालय प्रताप नगर जळगाव विद्यालयातील विद्यार्थी आकाश जितेंद्र सोळुंखे आणि पवन विजय सोनवणे यांनी आज जळगाव मनपा अंतर्गत मैदानी १७ वर्षाखालील क्रीडा स्पर्धेत लांब उडी व ४०० मीटर धावणे यात अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
पाचोऱ्यात 14 डिसेंबरला बंदचे आवाहन
या विद्यार्थ्यांची नाशिक विभाग क्रीडा स्तरावर निवड झाली असून विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षक श्री गुरु बारेला यांचे मार्गदर्शन लाभले आहे .यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री श्याम भाऊ कोगटा उपाध्यक्ष श्री संजीव जी बिर्ला सचिव श्री विनोदजी कासट शालेय समिती चेअरमन श्री विनोदजी बियाणी आणि सदस्य अडव्होकेट श्री राजेंद्र प्रसाद जी माहेश्वरी आणि विद्यालयातील मुख्याध्यापक सौ सरोज दिलीप तिवारी , प्राथमिक मुख्याध्यापक श्री हेमंत पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या