सांरगखेडा चेतक फेस्टिवलतर्फे आयोजित राष्ट्रीय अश्वचित्र शिल्प स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत २० राज्यांतून एकूण ८०० चित्रांचा सहभाग होता. त्यापैकी अंतिम स्पर्धेसाठी व प्रदर्शनासाठी २५० चित्रांची निवड करण्यात आली होती.bत्यात ५१ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक नीलेशbअशोक शिंपी, नगरदेवळा यांनी पटकावले. द्वितीय ३१ हजार रुपयांचे पारितोषिक राखी अग्रवाल, पुणे यांनी तर तृतीय २१ हजारांचे पारितोषिक भरत दास, पश्चिम बंगाल यांनी पटकावले.त्या चित्रांचे परीक्षण मुंबई येथील जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे प्रा. गजानन शेपाळ व नागपूर येथील प्रा. हेमंत सूर्यवंशी यांनी केले. विशेष चित्र पुरस्कार (रु. १० हजार ) नुसरत जहाँ रियाजोद्दीन चोपडा, विशेष शिल्प पुरस्कार रु.१० हजार) नंदकिशोर पाटील सावदा, ज्युरी अवॉर्ड (रु. ५ हजार) अंजली मुजुमदार – हरयाणा, दीपक पाटील सोलापूर, सोनाली पोवार कोल्हापूर, पल्लवी पाटील हैदराबाद, योगेश पाटील मुंबई, सूरज शेलार सिंधुदुर्ग, नंदकिशोर खेडकर, सचिन काळे नाशिक, वैभव गायकवाड नाशिक, शंकर आर. सोनवणे मुंबई, शाहरुख पिंजारी कोळदा, ता. नंदुरबार, दिव्या जैन- पाचोरा या पारितोषिक प्राप्त विजेत्यांचे अध्यक्ष जयपाल सिंहजी रावल यांनी अभिनंदन केले. ८० ते १५० फुटांच्या या प्रशस्त गॅलरीला भारतातील ज्येष्ठ चित्रकार = दत्तात्रय पाडेकर यांनीही भेट दिली. तसेच चोपडा येथील ललित कला केंद्राचे प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी – चित्रमूल्ये, चित्र कसे पाहावे वाचावे यावर संबोधित केले. परिसरातील कलारसिकांना भारतभरातील विविध कलावंतांच्या कलाकृती पाहण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल चेतक फेस्टिवल कमिटीचेही त्यांनी आभार मानले. यावेळी त्यांनी कलावंतांसोबत संवाद साधला.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून एकाचा मृत्यू; 50 जण जखमी
कला महोत्सवाला यंदा प्रतिसाद
या चित्रप्रदर्शनामुळे भविष्यात अनेक कलावंत निर्माण होतील, अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली. चेतक फेस्टिवल हा अश्वकलेसोबत ललित कलांचा कलामहोत्सव असल्याचेही त्यांनी नमूद केले. या स्पर्धेचे संपूर्ण नियोजन आदर्श हायस्कूल, लंगडी येथील कलाशिक्षक चतुर्भुज शिंदे
यांनी केले. यंदा स्पर्धेला देशभरातील कलावंतांनी प्रतिसाद दिला. कला क्षेत्रातील विविध मान्यवरांनी याठिकाणी भेट दिली.