माहेश्वरी विद्याप्रसारक मंडळ संचलित अभिनव प्राथमिक विद्यालय प्रतापनगर येथे शनिवार दि.२४ डिसेंबर २०२२ रोजी साने गुरूजींची जयंती साजरी करण्यात आली.
शाळेचे मुख्याध्यापक श्री.हेमंत पाटील सर यांनी साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.उपशिक्षिका सौ.शिल्पा रावतोळे व सौ.पूनम नेहेते साने गुरुजींच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला.
मनिष्का चौधरी,शानवी नन्नवरे व रितू मिस्तरी या विद्यार्थिनींनी साने गुरुजींची ‘खरा तो एकचि धर्म ‘ही प्रार्थना सादर केली.यानंतर संजेरीया खान कुरेशी,जान्हवी टकले,नेहा सोनवणे,दुर्गेश सोनवणे या विद्यार्थ्यांनी साने गुरुजींबद्दल माहिती सांगितली.
यावेळी श्रीमती साधना कोल्हे,सौ.वैशाली पाटील,सौ.नयना मोरे, सौ.दिप्ती नारखेडे,श्री.प्रेमसिंग चव्हाण,श्री.सजन तडवी,श्रीमती.उज्वला पवार,वैष्णवी सपकाळे,सौ.सपना पाटील,श्री.पंकज पाटील,देविदास चौधरी हे कर्मचारी उपस्थित होते.
सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काने शैक्षणिक पात्रतेनुसार मिळणार नियुक्ती…मुख्यमंत्री म्हणाले !