जि प प्राथमिक शाळा खडकदेवळा खुर्द (ता.पाचोरा) येथे बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात मेळावा भरवला.विद्यार्थ्यांना बालवयातच व्यवसाय, व्यवहार, नफा-तोटा याचे ज्ञान व्हावे.प्रत्यक्ष अनुभवातून हे व्यवहारज्ञान कळावे हा मुख्य हेतू या मेळाव्याच्या आयोजना मागे असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक श्री शरद पाटील सर यांनी सांगितले. या मध्ये विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ, भाजीपाला, स्टेशनरी साहित्याचे स्टॉल लावले होते. पालक व गावातील नागरिकांकडून या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष. श्री वाल्मिक तेली, उपाध्यक्ष श्री गोपाल सूर्यवंशी, श्री सुदाम वाघ, पोलीस पाटील श्री तुकाराम तेली, तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री नबाब शेख तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षिका श्रीमती भारती खैरनार, श्रीमती संध्या पाटील, शिक्षक श्री अजित चौधरी, श्री विरेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.
सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काने शैक्षणिक पात्रतेनुसार मिळणार नियुक्ती…मुख्यमंत्री म्हणाले !