सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज एक फेब्रुवारी रोजी सादर करताना सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे.
या टीमने तयार केला 2023-24 चा बजेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन अर्थ सचिव टी. व्ही. सोमनाथन आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव अजय सेठ गुंतवणूक व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांत पांडे महसूल विभागाचे सचिव संजय मल्होत्रा अर्थिक सेवा विभागाचे सचिव विवेक जोशी अर्थसंकल्प – शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विशेष निधी शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार कापसाच्या पिकातून शेतकऱ्यांना जास्त नफा मिळवून देण्याचा प्रयत्न
डाळींसाठी विशेष हब तयार करणार • ग्रीन ग्रोथच्या माध्यमातून रोजगार निर्माण करणार हैदराबादच्या श्री अन्न रिसर्च सेंटरला विशेष अनुदान अन्नधान्याच्या वाढीसाठी प्रयत्न करणार. अर्थसंकल्प – 38,800 शिक्षकांची भरती.. 38,800 शिक्षक-कर्मचाऱ्यांची भरती पुढच्या 3 वर्षांत केंद्राकडून ही भरती केली जाणार • एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी भरती साडेतीन लाख विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेतात – शिक्षकांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यातील कौशल्य वाढवणार शहरांमध्ये ड्रेनेज व्यवस्था सुधारणार, मॅनहोलचे रुपांतर मशीन होलमध्ये करणार अर्थसंकल्प – लाभार्थीच्या खात्यात थेट पैसे यूपीआय, कोविन अॅपमुळे भारताचे महत्त्व जगभरात मान्य जी -20 चे अध्यक्षपद भूषवण्याचा मान भारताला मिळाला 81 लाख महिला बचत गटांना आर्थिक मदत केली बचत गटाच्या माध्यमातून महिलांचा विकास केला लाभार्थीच्या खात्यात आता थेट पैसे ट्रान्सफर केले जातात.
पर्यावरणाकडे येत्या काळात अधिक लक्ष दिले जाईल.
पायाभूत सुविधा निर्माण करण्याला प्राधान्य 50 नव्या विमानतळांची घोषणा देशभरात 50 नवीन विमानतळ उभारणार सरकार नॅशनल डेटा गव्हर्नस पॉलिसी आणणार हरित क्रांतीसाठी विशेष योजना राबवणार व्यवसाय सुरु करण्यासाठी पॅन कार्ड मुख्य मुद्दा राहणार डीजी लॉकर वाढवण्यार भर दिला जाणार कृषी क्रेडिटसाठी मोठी आर्थिक मदत दिली जाणार • मोफत अन्न योजनेसाठी 2 लाख कोटींची तरतूद 0-40 वयोगटातील व्यक्तीचे हेल्थ स्क्रिनिंग होणार देशातील कारागिरांसाठी विशेष योजना वैद्यकीय क्षेत्रात संशोधनासाठी प्रोत्साहन देणार शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी विविध योजना सहकार मॉडेलला येत्या काळात प्राधान्य देणार शाळकरी मुलांसाठी डिजिटल योजना राबवणार मत्स्य व्यवसायासाठी 6 हजार कोटींची गुंतवणूकअन्न विकेंद्रीकरण योजना राबवणार
7 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्स नाही. 7 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही इन्कम टॅक्स लागणार नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली आहे. आयकराची मर्यादा 5 लाखावरून 7 लाखांपर्यंत करण्यात आली आहे.
अर्थसंकल्प
– तुम्हाला किती टॅक्स भरावा लागणार?
3 लाखांपर्यंत उत्पन्न – कोणताही कर नाही
3 ते 6 लाख उत्पन्न – 5 टक्के कर
6 ते 9 लाख उत्पन्न – 10 टक्के कर 9 ते 12 लाख उत्पन्न – 15 टक्के कर
12 ते 15 लाख उत्पन्न – 20 टक्के कर
15 लाखांहून जास्त उत्पन्न- 30 टक्के कर