माहेश्वरी विद्या प्रसारक मंडळ संचलित अभिनव प्राथमिक विद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले .कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्यध्यापक श्री हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती साधना कोल्हे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. त्यानंतर फैजल सय्यद,नवल धुरंदर या विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा सादर केली.तसेच बौद्धमी तायडे, वेदांत सोनवणे,शानवी कोळी,समर्थ साळुंखे या विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांविषयी भाषण दिले.या कार्यक्रमाच्या वेळी वैशाली पाटील,नयना मोरे,दीप्ती नारखेडे,प्रेमसिंग चव्हाण,सजन तडवी,उज्वला पवार,शिल्पा राऊतोडे,पुनम नेहते,वैष्णवी सपकाळे,सपना पाटील,पंकज पाटील,लताताई माळी हे सर्व शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.