आज दिनांक ७ डिसेंबर रोजी शिक्षक पदवीधर आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. ना. दीपक केसरकर साहेब व शालेय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव मा. रणजितसिंह देओल यांची भेट घेतली. राज्य शासनाने नुकताच राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांसाठी जाहीर केलेला ११६० कोटी रुपयांच्या निधीचा शासननिर्णय लवकर निर्गमित करण्याची विनंती डॉक्टर सुधीर तांबे यांनी केली, तसेच राज्यातील केंद्रप्रमुख भरती प्रक्रियेसंदर्भात दि. १ डिसेंबर २०२२ रोजी काढलेल्या शासन निर्णयामध्ये सर्व प्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना संधी द्यावी, वयाची ५० वर्षे मर्यादा शिथिल करावी व सेवाज्येष्ठता व गुणवत्ता विचारात घेताना एम. एड. पदवी विचारात घ्यावी या मागण्या केल्या.
तसेच राज्यातील खासगी विनाअनुदानित वरून अनुदानित शाळा किंवा तुकडीवर बदली करण्याबाबतची ८ जुलै २०२० ची शासन अधिसूचना व शासन निर्णय दि. १ एप्रिल २०२१ मधील तरतुदीस स्थगिती देण्याबाबतचे १ डिसेंबर २०२२ चे शासन अन्यायकारक परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली.
यावेळी मा.मंत्रीमहोदय यांनी मागणीचा सकारात्मक विचार करून त्या अनुषंगाने लवकरात लवकर सकारात्मक कार्यवाही होईल असे आश्वासन दिले.
राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकार राज्यात ‘केरळ पॅटर्न’ राबविणार