चाळीसगाव – राज्यपाल भगतसिंग कोशारी व भाजपच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अवमान केल्याच्या निषेधार्थ दि ११ डिसेंबर २०२२ रोजी रयत सेना,संभाजीसेना,समता सैनिक दल,मराठा सेवा संघ,मराठा महासंघ व शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने चाळीसगाव बंदची हाक देण्यात आली होती , शिवप्रेमी संघटना व सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने रेल्वे स्टेशन पासून रॅली ला सुरुवात करण्यात आली तेथून रॅली निघून स्टेशन रोड ने तहसील कार्यालय ,बाजारपेठ ,सराफ बाजार ,मुसा कादरी बाबा चौक, तेथून नागद रोड ने घाट रोड मार्गे ए बी हायस्कूल पर्यंत तेथून करगाव रोड मार्गे भडगाव रोड वरून गणेश रोड ,गणेश रोड वरून छत्रपती शिवाजी महाराज चौक तेथून तहसील कार्यालय येथे रॅलीची सांगता करण्यात आली.रॅलीत विविध घोषणांनी शहर दणाणून गेले चाळीसगाव बंद मध्ये सर्व श्री लक्ष्मण शिरसाठ,गणेश पवार,धर्मभूषण बागुल ,ॲड राहुल जाधव,वर्धमान धाडीवाल , पत्रकार व रहा अपडेट चे मुराद पटेल ,अरविंद पाटील, खुशाल मराठे, अरुण पाटील,खुशाल बिडे, स्वप्नील जाधव , संजय कापसे ,छोटू अहिरे ,महेद्र जैस्वाल ,शैलेंद्र सातपुते, वसंत मरसाळे, सोमनाथ गायकवाड , बाबा पगारे, रामेश्वर चौधरी, किरण आढाव, सचिन स्वार ,स्वप्नील गायकवाड,अविनाश काकडे,गोकुळ पाटील,चंद्रकांत ठाकरे,सतीश पवार,प्रमोद वाघ, ज्ञानेश्वर कोल्हे,अनिल कोल्हे,डॉ रवि चव्हाण,मुकुंद पाटील,गोकुळ पाटील,सविता कुमावत,प्रा तुषार निकम,ॲड ईश्वर जाधव,रमेश शिंपी,सुधाकर मोरे, विलास चव्हाण,सागर निकम,उमेश पवार,भाऊसाहेब सोमवंशी,भैय्यासाहेब पाटील ,प्रदीप मराठे,आर बी जगताप,कुशल देशमुख,भूषण पाटील,मंगेश देठे यांचेसह मा नगरसेवक भगवान राजपूत,रामचंद्र जाधव,सूर्यकांत ठाकूर यांच्यासह असंख्य सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
रस्त्यात ठिकाणी अनेक नागरिक रॅलीत सहभागी होत होते.अनेकांनी रस्त्यात थांबून बंद ला पाठिंबा दिला आणि आपला असंतोष व्यक्त केला.
महाराष्ट्र सरकार मधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी क्रांतीसुर्य महात्मा फुले , विश्र्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर , कर्मवीर भावराव पाटील यांचे बाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा देखील या प्रसंगी तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला . चाळीसगाव शहरातील व्यापारी,सर्व दुकानदारानी बंद पाळून सहकार्य केले
जिल्हा दूध संघाची बाजी मारत शेतकरी विकास पॅनलची एकहाती सत्ता ;खडसेंसह दिग्जजांचा पराभव