आज दिनांक 5 जानेवारी 23 रोजी पंचायत समिती (शिक्षण विभाग) जळगाव आणि श्री स्वामी समर्थ विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन श्री स्वामी समर्थ विद्यालय कुसुंबा जळगाव येथे संपन्न झाले.विज्ञान प्रदर्शनात जळगाव तालुक्यातील शाळांमधील माध्यमिक व प्राथमिक सुमारे 140 शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला अनेक विद्यार्थी शास्त्रज्ञ यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत विविध वैज्ञानिक उपकरणे सादर केले, तसेच शिक्षक शास्त्रज्ञांनी सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी उपकरणे बनवली व विज्ञान प्रदर्शनात सहभागी झाले. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी समर्थ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुसुंबा यांनी ढोल ताशाच्या गजरात लेझिम सादर करत केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी ग.स.सोसायटी चेअरमन तथा स्वामी समर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज कुमार आत्माराम पाटील , माध्यमिक उपशिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण आणि इजाज शेख, गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण विस्ताराधिकारी , प्रतिमा सानप प्रशासन अधिकारी दिपाली पाटील सरला पाटील, शा पो आ अधिक्षक खलील शेख मुख्याध्यापक संघ अध्यक्ष संजय खंबायत, संपादक साधना लोखंडे ,राजेंद्र खोरगळे, विजय गिरनारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माजी राष्ट्रपती व वैज्ञानिक एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत आयोजक श्री स्वामी समर्थ फाउंडेशन कुसुंबा यांच्यातर्फे पुष्पगुच्छ तसेच श्री स्वामी समर्थांची प्रतिमा देऊन करण्यात आले.
त्यानंतर प्राथमिक , माध्यमिक आणि शिक्षक प्रतिनिधी अशा तीन गटात विज्ञान प्रदर्शन विभागण्यात आले. सर्वच विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम, नाविन्यपूर्ण संशोधनात्मक कृती जोपासत नवनवीन उपकरणे सादर केले. तसेच शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना विज्ञान कृतीतून प्रयोगाद्वारे सोप्या पद्धतीने कसे शिकवता येईल यासाठी नवनवीन उपकरणे बनवली.
प्राथमिक विद्यालय गटात प्रथम प्रेरणा अरुण पाटील जि प कुसुंबा द्वितीय सुशील विनोद पाटील जि प शाळा नांद्रे बुद्रुक ने तृतीय नेहा प्रमोद शिंपी नंदिनीबाई विद्यालय जळगाव आणि उत्तेजनार्थ म्हणून संकेत बापू धनगर थेपडे विद्यालय म्हासावद यांना पारितोषिक मिळाले. माध्यमिक शाळा गटामध्ये प्रथम हर्षल धनराज पाटील स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय कुसुंबा
द्वितीय जयेश उमेश विसपुते प्रगती माध्यमिक विद्यालय तृतीय सोहम प्रफुल्ल पाटील का. उ.कोल्हे माध्यमिक विद्यालय जळगाव आणि उत्तेजनार्थ मानसी संजय चौधरी ,नंदिनी बाई माध्यमिक विद्यालय यांना पारितोषिक मिळाले शिक्षक गटामध्ये प्रथम अनिता राजेश शिरसाठ मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव द्वितीय अश्विनी योगराज फालक संस्कृती माध्यमिक विद्यालय. आणि तृतीय ऋषिकेश विनोद पाटील महाराणा प्रताप विद्यालय यांना पारितोषिक मिळाले. सर्व पारितोषिक प्राप्त विद्यार्थी शास्त्रज्ञ व शिक्षक शास्त्रज्ञ यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन करण्यात आला. यावेळी परीक्षक म्हणून सुरेश कुलकर्णी ,गोपाल महाजन अर्चना चौधरी ,शिवाजी पाटील सुचिता भोळे, डी. बी राणे यांनी आपली भूमिका मांडली
यावेळी शिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण यांनी उपस्थित सर्वांना संबोधित करत प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा . व प्रत्येक विद्यार्थ्यांमधून बाल वैज्ञानिक निर्माण होऊन आपल्या देशाला सर्व देशाच्या तुलनेत नंबर एक होण्यासाठी योगदान द्यावे असे म्हणून विद्यार्थ्यांना प्रेरणा देत सर्व बालशास्त्रज्ञांचे तसेच शिक्षकांचे कौतुक व आभार व्यक्त केले.
गट शिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला शास्त्रज्ञ आहे नवनिर्माण कल्पना प्रयत्नांची पराकाष्टा करून यश संपादन करता येते असे संबोधित केले.
स्वामी समर्थ संस्थेचे अध्यक्ष मनोज कुमार आत्माराम पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत प्रथम द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळवणाऱ्या विद्यार्थी शास्त्रज्ञांना प्रत्येकी अनुक्रमे एक हजार रुपये, पाचशे रुपये आणि तीनशे रुपये असे बक्षीस जाहीर केले.
यावेळी जळगाव तालुक्यातील सुमारे 75 प्राथमिक शाळा आणि 75 माध्यमिक शाळा यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वामी समर्थ विद्यालय प्राथमिक मुख्याध्यापक प्रतीक्षा पाटील , माध्यमिक मुख्याध्यापक दिपाली भदाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी रुंद यांनी प्रयत्न केले. यावेळी जळगाव तालुक्यातील सहभागी विद्यालयातील विद्यार्थी, विज्ञान शिक्षक उपस्थित होते.
जिजाऊ ब्रिगेडतर्फे सावित्रीबाई जन्मोत्सव साजरा