पाचोरा (वार्ताहर) दि,८
बडगुजर समाज राज्यात संख्येने लहान असेल मात्र मनाने हा समाज मोठा समाज आहे शब्द पाळणारा समाज म्हणून त्यांची ख्याती असून बडगुजर समाजाची एकजूट उल्लेखनीय असून समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई पुणे आदी मोठ्या शहरात लवकरच समाजाचे वस्तीगृह उभारले जातील असे सूतोवाच दिले मात्र आचारसंहितेमुळे त्याची घोषणा करता येणार नसल्याचे सांगत त्यांनी सुचक इशारा मुख्यमंत्र्यांनी(CM) आपल्या भाषणातून दिला.
बडगुजर समाज चामुंडा माता मिशन संचालित अखिल बडगुजर समाज महाअधिवेशन कार्यक्रमासाठी महाराष्ट्र(Maharashtra) राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे पाचोरा तालुक्यातील लोहारी बुद्रुक येथे बोलत होते.
यावेळी मंचावर पालकमंत्री गुलाबराव पाटील मंत्री .गिरीश महाजन,आ.किशोर अप्पा पाटील आमदार चिमणराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, खासदार न्यानेश्वर पाटील (मध्य प्रदेश), दयानंद महाराज, माजी नगराध्यक्ष सुनीता पाटील,नरेंद्र बडगुजर, संजय गोहिल, सुमीत पाटील, उमेश करोडपती आदींची उपास्थिती होती.
यावेळी आम किशोर अप्पा पाटील, ना.गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन यांची भाषणे झाली.
पुढे बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, चांमुंडा मातेच्या आशीर्वादानेच आम्ही देखील राज्यात सत्तांतर केले असून आपले सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असून शेतकरी हा आपला अन्नदाता असून त्याचे जीवनमान बदलले पाहिजे यासाठी आम्ही काम करत असून
राज्यात आपल्या सरकारने लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. राज्यातील 30 हजार पाणी पुरवठा योजनांना नामदार गुलाबराव पाटील यांनी मंजुरी दिली असून ओबीसी समाजा साठी असलेल्या सारथी,महाज्योति योजनांना आम्ही उभारी देत असून अमृत योजनेचा लाभ देखील प्रभावीपणे जनतेला देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. केंद्रात पंतप्रधान (Prime Minister) देखील राज्याला सर्वतोपरी सहकार्य करत करत असल्याचे त्यांनी सांगितले.तर मी सी एम (CM) म्हणजे मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर कॉमन मॅन (Comman Man) म्हणून काम करत असल्याचे सांगत त्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.मी दिलेला शब्द पाळतो म्हणून आज पन्नास आमदारांनी माझ्यावर शब्दावर विश्वास ठेवत सत्ता परिवर्तन केले. कार्यक्रमाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर बडगुजर समाज बांधव उपस्थित होते.
असा आहे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा आजचा पाचोरा दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम