केंद्रीय निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला असून शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने बहाल केले असून हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याबाबतची लढाई सुरु होती. आज निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला असून धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील एकनाथ शिंदे यांना मिळाले आहे. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार की उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयातून काही दिलासा मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे
जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे