युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र द्वारा देशभरात युवा उत्सव कार्यक्रम पार पडला. त्याचाच एक भाग म्हणून नेहरू युवा केंद्र, जळगाव द्वारा छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात जिल्हा युवा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात पाचोरा येथील कमलेश सोनवणे यांना वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. खासदार उन्मेष दादा पाटील व नेहरू युवा केंद्राचे राज्य संचालक प्रकाश मनुरे यांच्या हस्ते कमलेश सोनवणेंचा सत्कार करण्यात आला. जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलीस अधिक्षक एम. राजकुमार तसेच अनेक दिग्गज मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.
झेरवाल अकॅडमी व प्री-स्कूल, पाचोरा येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात