पाचोरा, ता. १६ : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीने जळगाव ते चांदवड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ वरील जळगाव ते चाळीसगाव दरम्यानच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी गेल्या २१ फेब्रुवारीला केलेल्या रास्ता रोको आंदोलन केले होते. शासनाने जनतेचा रेटा व या आंदोलनाची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी ९ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याने या कामास सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील जळगाव ते चाळीसगाव दरम्यान अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहे.
भूसंपादनाच्या कारणावरून गेल्या चार वर्षांपासून काम पूर्ण होत नसल्याने अनेक अपघात व जीवितहानीचा सामना करावा लागला. वाहनांचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे भूसंपादनाचा विषय मार्गी लागेपर्यंत त्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात यावे व होणारे अपघात व हानी थांबवावी या मागणीसाठी २१ फेब्रुवारीस पाचोरा ते कजगाव दरम्यान पाच ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलन प्रसंगी प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्या समवेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व अभियंते यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणारे माजी आमदार दिलीप वाघ यांच्याशी बोलणी करून पंधरा दिवसात दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव सादर करून निधी मंजूर करून काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने दोन तासानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्याआधारे शासनाने 9 कोटी 20 लाखांचा निधी या कामासाठी मंजूर करून महामार्ग दुरुस्तीच्या कामास प्रारंभ केला आहे. या आंदोलनात दिलीप वाघ, संजय वाघ, वैशाली सूर्यवंशी, सचिन सोमवंशी, नितीन तावडे, विकास पाटील, अजहर खान, हर्षल पाटील, राहुल पाटील, श्याम भोसले, गणेश परदेशी, जे. के. पाटील, ललित वाघ, विनोद तावडे, योगेश सूर्यवंशी, विनोद बाविस्कर, शरद पाटील, व्ही. एस. पाटील, कुणाल पाटील, रमेश बाफना, सुनील पाटील, विनोद पाटील, सुदर्शन महाजन, महिला आघाडीच्या योजना पाटील, रेखा देवरे, सरला पाटील, ज्योती वाघ, रेखा पाटील, रवींद्र महाजन, योगेश महाजन, रणजीत पाटील, जनार्दन पाटील यांनी सहभाग घेतला होत.
२ व ३ एप्रिल रोजी जळगावात तिसरे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन