पाचोरा-प्रतिनिधी-
येथील नगरपरिषद कार्यालयात दिनांक 18/03/2023 रोजी न.पा.जिनातील महात्मा ज्योतिबा फुले व्यापारी संकूलातील गाळेधारक व न.पा.अधिकारी / कर्मचारी यांची बैठक मा.आमदार श्री.किशोर आप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत सदर व्यापारी संकूलातील गाळयांबाबत सकारात्मक चर्चा होऊन खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आला.
सद्यास्थितीत असलेले व्यापारी संकूल हे जिर्ण झालेले आहे. सदर व्यापारी संकूलास वैशिष्टपुर्ण योजनेअंतर्गत नविन अद्ययावत व भव्य व्यापारी संकूल उभारण्यासाठी शासनाकडून निधी प्राप्त झालेला आहे. नविन व्यापारी संकूलाचे बांधकाम सुरु करणेसाठी जुने गाळे पाडणे आवश्यक असल्याने सद्यास्थितीत असलेल्या गाळेधारकांशी चर्चा होऊन पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आला.
1)दिनांक 15 मे 2023 पावेतो सर्व गाळे धारकांनी गाळे रिकामे करुन न.पा.ताब्यात द्यावे.
2)गाळयांचे काम पुर्ण होईपावेतो तात्पुरती सोय म्हणून रावल जिनाजवळील डी.पी.रेाड वर सदर गाळेधारकांना जागा आखून देण्यात येईल.
3)सद्यास्थितीत भोगवटा करीत असलेल्या गाळे धारकांना नविन व्यापारी संकूलाचा जाहिर लिलाव करतांना विस्थापीत म्हणून शासन नियमान्वये कार्यवाही होऊन त्यांचे करीता गाळे आरक्षीत ठेवले जातील.
वरील प्रमाणे व्यापारी व न.पा.प्रशासन यांच्यात मा.आमदार महोदय यांच्या समक्ष झालेल्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला. सदर बैठकीस मा.आमदार श्री.किशोर आप्पा पाटील, मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती.शोभा भगवान बाविस्कर, उपमुख्याधिकारी दगडू शिवाजी मराठे, अभियंता ईश्वर सोनवणे, लेखापाल दत्तात्रय जाधव, सर्व गाळेधारक, वास्तूविशारद श्री.किरण पाटील, एम.एस.पी.बिल्डकॉनचे संचालक श्री.मनोज शांताराम पाटील, न.पा.कर्मचारी भागवत पाटील, महेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.