पाचोरा (वार्ताहर) दि,४
वाढदिवसाच्या कार्यक्रमांवर होणारी हजारो रुपयांची उधळपट्टी टाळत हार तुरे केक बॅनर अशा गोष्टींना फाटा देत पाचोर्यातील आकाश नन्नवरे या युवकाने आपण शिकत असलेल्या जागृती विद्यालय या शाळेचे आपण देणे लागतो या भावनेतून शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपातून एक नवा आदर्श वस्तुपाठ निर्माण केला आहे.
पाचोरा शहरातील जागृती विद्यालय या ठिकाणी दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी जागृती विद्यालयातील माजी विद्यार्थी आकाश आनंद नन्नवरे या विद्यार्थ्याने आपल्या वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. वाढदिवसानिमित्ताने अनेकजण हजारो रूपाची उधळपट्टी करत आपला वाढदिवस साजरी करत असतात.परंतु या युवकांनी आपल्या कुठल्याही पद्धतीचा केक फुलहार इत्यादी वस्तू न आणता गरीब होतकरू विद्यार्थ्यांना पेन, वही,शालेय उपयोगी वस्तू वाटप करायचे ठरवले. वाढदिवसाला शुभेच्छा द्यायच्या असतील तर शालेय वस्तू भेट देऊन मला शुभेच्छा द्याव्या .अशी विनंती त्याने सर्व मित्रांना केली होती.मित्रांची साथ व मदतीने या नवीन सामाजिक प्रथेला सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानी जागृती विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.जी सावंत हे होते. याप्रसंगी आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर डोंगरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे उद्घाटन ऍड.अमोल म्हस्के यांनी केले यावेळी अजय शिरसाठ, पूजा भोई यांनी सहकार्य केले. यावेळी शुभम खरे, राहुल अहिरे,विक्की जगताप,सचिन देहडे, दीपक सोनवणे,भीमा लहासे,गणेश पाटील, आकाश अहिरे,डिगंबर भिसे, विक्की शिरसाट हे उपस्थित होते. सूत्रसंचालन टी.आर.पाटील यांनी केले तर मार्गदर्शक म्हणून माजी मुख्याध्यापक आर.एस.वाणी हे होते.सदर कार्यक्रमाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना आकाश नन्नवरे यांनी आपल्या जागृती विद्यालयातील बालपणाचे किस्से सांगत मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे अॅड.अमोल म्हस्के व सामाजिक कार्यकर्ते किशोर डोंगरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत आकाश नन्नवरे याचे कौतुक केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष जागृती महाविद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी आपले मनोगत व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले.
काकनबर्डी येथील खंडोबा मंदिर परिसराचा होणार कायापालट ; पर्यटन विकासासाठी पाच कोटींना मान्यता आ. किशोर अप्पा पाटील